01 March 2021

News Flash

या शहरातल्या हज हाऊसला भगवा रंग

राज्यातील मुख्यमंत्र्यांच्या कार्यलयालाही भगवा रंग

लखनऊ येथील हज हाऊस या इमारतीला भगवा रंग

उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ या ठिकाणी असलेल्या हज हाऊसला आता भगवा रंग देण्यात आला आहे. लखनऊ या शहरातील बापू भवनासमोर हज हाऊस आहे. शुक्रवारी या हज हाऊसच्या भिंतींना भगवा रंग देण्यात आला. या हज हाऊसचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार अल्पसंख्याक कल्याण बोर्डाच्या वतीने हज हाऊस रंगवण्यात आले. याआधी हज हाऊसच्या भिंती पांढऱ्या आणि हिरव्या रंगात रंगवण्यात आल्या होत्या.

फक्त लखनऊमधेच नाही तर राज्यातल्या इतर शहरांमध्येही इमारतींना भगवा रंग दिलेला बघायला मिळतो आहे. डिसेंबर महिन्यात पीलभीत या ठिकाणी असलेल्या १०० पेक्षा जास्त शाळांना भगवा रंग देण्यात आला. शिक्षकांनी केलेला विरोध झुगारून हा रंग देण्यात आला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ऑक्टोबर महिन्यात त्यांच्या कार्यालयाला भगवा रंग दिला. तेव्हापासूनच इमारतींना भगवे रंग देण्याचे काम उत्तर प्रदेशात सुरु आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 5, 2018 5:49 pm

Web Title: uttar pradesh exterior walls of haj house in lucknow painted saffron
Next Stories
1 पाकिस्तानकडून पुंछ भागात शस्त्रसंधीचे उल्लंघन; भारताकडून जोरदार प्रत्युत्तर
2 चारा घोटाळा: लालूंच्या शिक्षेच्या निकालाला तारीख पे तारीख
3 मंत्रालयातील शिपायाच्या जागेसाठी आमदाराच्या मुलाचा अर्ज
Just Now!
X