News Flash

संगोपनाचा खर्च परवडणार नाही; आई-वडिलांनी २० दिवसांच्या जुळ्या मुलींना फेकलं तलावात

'त्या दोघांच्या संगोपनाचा खर्च आम्हाला परवडणार नव्हता म्हणून टोकाचे पाऊल उचलले'

जुळ्या मुलींना फेकलं तलावात

उत्तर प्रदेशमधील भिकी गावामधील एका दांपत्याने आपल्या २० दिवसांच्या जुळ्या मुलींना तलावात बुडवून ठार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रोजंदारीवर काम करणाऱ्या वसीम आणि नझमा या दोघांनी २१ सप्टेंबर रोजी आपल्या जुळ्या बाळांना जवळच्या तलावामध्ये फेकून दिले. या दोघींच्या संगोपनाचा खर्च परवडणार नाही म्हणून त्यांना तलावात फेकल्याची कबुली दांपत्याने दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या दांपत्याने शनिवारी रात्री आपल्या नवजात जुळ्या मुलींना तलावात फेकून दिले. या दोघांनाही एक सात वर्षांचा मुलगा आहे. मुलींच्या संगोपनाचा खर्च करणे शक्य नसल्याने आम्ही हे टोकाचे पाऊल उचचल्याचे आरोपींने पोलिसांना दिलेल्या जबाबामध्ये म्हटले आहे. मात्र या दोघांना मुली नको असल्यानेच त्यांनी या दोन्ही बाळांचा जीव घेतल्याचा आरोप शेजाऱ्यांनी केला आहे.

आपल्या दोन्ही नवजात मुली हरवल्या आहेत अशी तक्रार वसीमनेच पोलिसांकडे नोंदवली. ‘रविवारी सकाळी आम्ही झोपेतून उठलो तेव्हा आमच्या मुली घरात नव्हत्या,’ असं वसीमने या तक्रारीमध्ये म्हटले होते. पोलिसांनी वसीम आणि त्याची पत्नीची चौकशी करत तपासाला सुरुवात केली. दोघांच्या उत्तरांमध्ये तफावत अढळल्यानंतर पोलिसी खाक्या दाखवल्याने दोघांनी गुन्हा कबुल केला. दोन्ही मुलींची जबाबदारी झटकण्याच्या उद्देशाने आपणच त्यांचा जीव घेतल्याची कबुली या दोघांनी दिली. ‘आमची आर्थिक परिस्थिती खूपच हालाखीची आहे. आम्हाला दोन्ही मुलींचा खर्च करणे शक्य नव्हते म्हणून आम्ही त्यांना तळ्यात सोडून दिले,’ अशी धक्कादायक जबाब या दोघांनी पोलिसांकडे नोंदवला आहे.

या प्रकरणात पोलिसांनी खून आणि पुरवा नष्ट करण्याच्या आरोपाखाली दांपत्याला अटक केली आहे. दोन्ही मुलींचे मृतदेह पोलिसांनी तलावातून बाहेर काढून ते शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 24, 2019 9:13 am

Web Title: uttar pradesh father drowns twenty day old twin daughters as he could not bear their expenses scsg 91
Next Stories
1 नरेंद्र मोदींचं विधान अत्यंत आक्रमक होतं : डोनाल्ड ट्रम्प
2 अमेरिकेच्या मदतीनं ISI कडून दशतवाद्यांना प्रशिक्षण : इम्रान खान
3 ट्रम्प यांचे दोन दगडांवर पाय; पाकिस्तानला पण चुचकारलं
Just Now!
X