उत्तर प्रदेशच्या बाराबंकीमध्ये नात्यात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. पैशासाठी माणसांची तस्करी करणाऱ्या एका व्यक्तीने स्वत: च्या सूनेवाच ८० हजार रुपयांना विकण्याचा प्रयत्न केला. आजारपणाच्या बहाण्याने सासऱ्याने आधी गाझियाबादहून सूनेला त्याने बोलावले होते. त्यानंतर तिला गुजरातमधल्या व्यक्तीकडे तिची विक्री केली. मुलाला या सर्व प्रकाराची माहिती मिळताच त्याने त्वरित पोलिसांना हा सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत आरोपींचा शोध सुरू केला.

रामनगरच्या मल्लापूर गावात राहणाऱ्या चंद्रराम वर्मा यांच्या मुलगा प्रिंन्स याने २०१९ मध्ये आसामच्या एका मुलीसोबत प्रेमविवाह केला होता. इंटरनेटवरुन त्यांची ओळख झाली होती. प्रिंन्स आपल्या पत्नीसोबत गाझियाबादहून येथे राहत होता. तिथे तो टॅक्सी चालवण्याचे काम करत होता. त्यात गावात राहणाऱ्या रामू गौतमने गुजरातमध्ये लग्नासाठी मुलगी हवी असल्याची चंद्रपाल याला सांगितले. त्यानंतर चंद्रपालने आपल्या सूनेलाच विकण्याचे ठरवले. आजारी असल्याचे खोटं सांगत त्याने सूनेला बोलवून घेतले आणि तिला त्या व्यक्तींकडे सोपवले.

८ जणांना अटक करण्यात यश

पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतले आणि गुजरातमध्ये राहणा ८ जणांना अटक केली आहे. दरम्यान चंद्रराम आणि अन्य एक व्यक्ती अद्याप फरार आहे. बाराबंकीच्या रामनगर पोलीस स्टेशनच्या परिसरात ही घटना घडली. प्रिंन्सने त्याच्या वडीलांनी पत्नीला गुजरातमध्ये राहणाऱ्या काही लोकांना विकले असल्याची माहिती पोलिसांना दिली होती.

बहिणीच्या प्रियकराची हत्या करणाऱ्यांना अटक

अद्याप ८ लोकांना अटक

या महिलेला घेऊन जाण्यासाठी आरोपी बाराबंकी रेल्वे स्टेशनवर काही लोक उपस्थित होते. पोलिसांना मानवी तस्करीबद्दल माहिती मिळताच त्यांना लगेचच रेल्वे स्टेशन गाठले. पोलिसांनी स्टेशनवरुन त्या महिलेसह ८ जणांना ताब्यात घेतले. त्यामध्ये तीन महिलांचा देखील समावेश आहे.

मुंबई हादरली! अल्पवयीन मुलीवर एका रात्रीत तीन वेगवेगळ्या ठिकाणी मित्रांनी केला गँगरेप

आरोपी सासरा अद्याप फरार

महिलेच्या पतीच्या तक्रारीनंतर पकडण्यात आलेल्या आठ लोकांसोबत रामू गौतम नावाच्या व्यक्ती विरोधात मानवी तस्करी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्य आरोपी त्या महिलेचा सासरा आणि रामू गौतम अद्याप फरार आहे. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.