उत्तर प्रदेशातील आठ पोलिसांची हत्या करणाऱ्या कुख्यात गुंड विकास दुबे याला ठार करण्यात आलं आहे. विकास दुबेला अटक केल्यानंतर विशेष पथक त्याला घेऊन कानपूरला चाललं होतं. यावेळी पोलिसांच्या ताफ्यातील एका वाहनाचा अपघात झाला. यानंतर विकास दुबेने पळून जाण्याचा प्रयत्न केला. विकास दुबे याने पोलिसांचं शस्त्र घेऊन गोळीबार करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी विकास दुबेला आत्मसमर्पण करण्यास सांगितलं. यादरम्यान झालेल्या चकमकीत पोलिसांनी विकास दुबेला ठार करण्यात आलं. यानंतर आता उत्तर प्रदेशात राजकारणाला सुरूवात झाली आहे. या चकमकीवरून उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी सरकारवर आरोप केले आहेत.

आणखी वाचा- अपघात, पळून जाण्याचा प्रयत्न आणि चकमक; अशा पद्दतीने विकास दुबे झाला ठार

“खरंतर ही गाडी उलटली नाही. काही माहिती उघड झाल्यास सरकार पडण्यापासून वाचवण्यात आलं आहे,” असा गंभीर आरोप अखिलेश यादव यांनी केला आहे. त्यांनी ट्विटरवरून सरकारवर निशाणा साधला.

आणखी वाचा- ३० वर्षात पाच हत्या, ६२ गुन्हे यूपीचा खतरनाक गँगस्टर विकास दुबे

आणखी वाचा- गुन्हेगाराचा शेवट झाला पण गुन्ह्यांना संरक्षण देणाऱ्यांचे काय?, प्रियंका गांधींचा सवाल

पोलिसांनी रुग्णालयात प्रसारमाध्यमांशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार, विकास दुबे याने अपघातानंतर पळून जाण्याचा प्रयत्न केला. यानंतर झालेल्या चकमकीत विकास दुबे जखमी झाला होता. जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यावेळी त्याचा मृत्यू झाला. या चकमकीत दोन पोलीस कर्मचारीही जखमी झाले आहेत. कुख्यात गुंड विकास दुबेला गुरुवारी पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. मध्य प्रदेशातील उज्जैन येथे विकास दुबेला अटक करण्यात आली. गेल्या आठवड्यापासून पोलीस विकास दुबेचा शोध घेत होते. त्याच्यावर पाच लाखांचं बक्षीसदेखील जाहीर करण्यात आलं होतं. अनेक नाट्यमय घडामोडींनंतर अखेर विकास दुबे पोलिसांच्या हाती लागला.