28 February 2021

News Flash

“बकरी ईदला कुर्बानी द्यायची असेल तर आपल्या मुलांची द्या”, भाजपा आमदाराचं धक्कादायक वक्तव्य

बकरे कापण्याऐवजी आपल्या मुलांचा बळी द्या, भाजपा आमदाराचं वक्तव्य

संग्रहित

उत्तर प्रदेशातील गाजियाबाद येथील भाजपा आमदार नंदकिशोर गुर्जर यांनी बकरी ईदला कुर्बानी देण्यावरुन वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. “करोनाच्या पार्श्वभूमीवर कोणीही कुर्बानी देऊ नये. जर कुर्बानी द्यायचीच असेल आपल्या मुलांची द्या,” असं धक्कादायक वक्तव्य त्यांनी केलं आहे. प्रसारमाध्यमांशी बोलत असताना त्यांनी लोनी येथे कुर्बानी देणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

“सनातन धर्मात आधी बळी दिला जात होता, पण आता त्याऐवजी नारळ फोडला जातो. बकरा कापला जात नाही. त्याचप्रमाणे इस्लाम धर्म मानणाऱ्यांना माझी विनंती आहे. तेदेखील आपल्या पवित्र गोष्टीची, आपल्या मुलांचा बळी देत नाहीत. जर कोणी म्हणत असेल मला कुर्बानी द्यायची आहे तर त्याने आपल्या मुलांची कुर्बानी द्यावी. निर्दोष जनावराचा बळी देऊन त्याचं सेवन केल्याने पुढील जन्मात त्यालाही बकरा व्हावं लागेल आणि लोक त्याला खातील. हा निसर्गाचा नियम आहे. ज्याचं जसं कर्म आहे तसं त्याला भोगावं लागतं,” असं नंदकिशोर गुर्जर यांनी म्हटलं आहे.

देशात सध्या करोनाने थैमान घातलं असून अद्यापही त्यावर नियंत्रण मिळवण्यात यश मिळालेलं नाही. संकटाच्या या काळात सरकार वारंवार लोकांना धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रम टाळण्याचं आवाहन करत आहे. सोबतच बकरी ईद तसंच इतर सण घरातच साजरे करण्याचं आवाहन केलं जात आहे.

बकरी ईद: सरकारच्या नियमावलीत कुर्बानीवर बंदी नाही-नवाब मलिक
दरम्यान महाराष्ट्रात बकरी ईद साजरी करण्याबाबत जी नियमावली जाहीर झाली आहे त्या नियमावलीत कुर्बानीवर बंदी घालण्यात आलेली नाही अशी माहिती अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे. बकरी ईद संदर्भात कोणतेही गैरसमज नाहीत. वाहतुकीसंदर्भात जे काही गैरसमज होते तेदेखील आता दूर झाले आहेत असंही नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं आहे.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बकरी ईद साजरी करण्याबाबत जे गैरसमज होते त्याबाबत मुख्यमंत्र्यांना माहिती दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 28, 2020 2:04 pm

Web Title: uttar pradesh ghaziabad bjp mla nandkishore gurjar controversial statement on bakri eid sgy 87
Next Stories
1 करोनावरील उपचारासंबधी दोन आठवड्यात ‘गुड न्यूज’, डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
2 रशियाकडून चीनला मोठा झटका, घातक S-400 मिसाइलचा पुरवठा रोखला
3 नेपाळ, अफगाणिस्तान या देशांनी पाकिस्तानप्रमाणेच बनावं : चीन
Just Now!
X