17 January 2021

News Flash

महाराष्ट्रापाठोपाठ आता उत्तर प्रदेशातही प्लास्टिक बंदी

दंडाच्या तरतुदीची नियमावली अद्याप जाहीर नाही

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

महाराष्ट्रात प्लास्टिकबंदीचा निर्णय घेण्यात आला. प्रदूषण रोखण्यासाठी प्लास्टिक बंदी घालण्यात आली. या पाठोपाठ आता उत्तर प्रदेशातही प्लास्टिकबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. १५ जुलैपासून उत्तर प्रदेशातही प्लास्टिक बंदी लागू होणार आहे. काही वेळापूर्वीच एएनआयने या संदर्भातले वृत्त दिले आहे. महाराष्ट्रात या निर्णयाचा मनसेने विरोध केला आहे. प्लास्टिक बंदीला पर्याय द्या आणि मग ही बंदी लागू करा अशी भूमिका मनसेने घेतली आहे. तसेच मुख्यमंत्री यावर काहीही बोलत नाहीत?असाही प्रश्न मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी उपस्थित केला. एवढेच नाही तर ही प्लास्टिकबंदी निवडणूक निधी गोळा करण्यासाठी लागू करण्यात आली आहे असेही त्यांनी म्हटले आहे.

उत्तर प्रदेशात प्लास्टिकबंदीचे स्वागत होते की विरोध हे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे. महाराष्ट्रात प्लास्टिक पिशवी वापरणाऱ्याला ५ हजारांपासून २५ हजारांपर्यंतच्या दंडाची तरतूद आहे. अशी काही नियमावली उत्तरप्रदेश सरकारने म्हणजेच योगी आदित्यनाथ सरकारने तयार केली आहे का? हे अद्याप समोर आलेले नाही. मात्र आता उत्तरप्रदेशात १५ जुलैपासून प्लास्टिक बंदीचा निर्णय घेण्यात आला आहे.

योगी आदित्यनाथ सरकारने घेतलेल्या या निर्णयाची अंमलबजावणी योग्य पद्धतीने केली जाते की नाही? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे तसेच विरोधक या निर्णयावर काय भूमिका घेणार हेदेखील येत्या काळात स्पष्ट होईलच. दरम्यान उत्तर प्रदेश सरकारतर्फे आजच हा आदेश जारी करण्यात आला आहे.

१५ जुलै नंतर आपल्याला पूर्ण राज्यात प्लास्टिक बंदी करायची आहे. मी लोकांना आवाहन करतो की त्यांनी १५ जुलैनंतर प्लास्टिक कप, ग्लास, कॅरिबॅग यांचा वापर करू नये. प्लास्टिक बंदीसाठी उत्तरप्रदेशच्या जनतेचे सहकार्य अपेक्षित आहे असे ट्विटही उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री  योगी आदित्यनाथ यांनी केले आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 6, 2018 1:26 pm

Web Title: uttar pradesh government has issued an order to ban use of plastic in the state from 15th july
Next Stories
1 धार्मिक तेढ पसरवल्याचा ठपका ठेवत न्यूज अँकरविरोधात गुन्हा
2 ओडिशाच्या राज्यपालांचा हरियाणा दौऱ्यावर ४६ लाखांचा खर्च, सरकारने मागितलं स्पष्टीकरण
3 “मला खूश केलंस तर संयुक्त राष्ट्रात नोकरी मिळवून देईन”
Just Now!
X