News Flash

कानपूरमध्ये पूर्वा एक्स्प्रेसचे 12 डबे रुळावरुन घसरले, 20 प्रवासी जखमी

कानपूरमधील रुमा गावाजवळ शनिवारी पहाटे पूर्वा एक्स्प्रेसचे 12 डबे रुळावरुन घसरले. पूर्वा एक्स्प्रेस हावडा येथून दिल्लीला जात होती.

कानपूरमधील रुमा गावाजवळ शनिवारी पहाटे पूर्वा एक्स्प्रेसचे 12 डबे रुळावरुन घसरले. पूर्वा एक्स्प्रेस हावडा येथून दिल्लीला जात होती.

उत्तर प्रदेशमधील कानपूर येथे भीषण रेल्वे अपघात झाला असून पूर्वा एक्स्प्रेसचे 12 डबे रुळावरुन घसरले. या अपघातात 20 प्रवासी जखमी झाले आहेत.

कानपूरमधील रुमा गावाजवळ शनिवारी पहाटे पूर्वा एक्स्प्रेसचे 12 डबे रुळावरुन घसरले. पूर्वा एक्स्प्रेस हावडा येथून दिल्लीला जात होती. एक्स्प्रेस कानपूर स्थानकात पोहोचण्यापूर्वी हा अपघात झाला. 12 डब्यांमध्ये भोजनयान आणि पॉवर कारचा समावेश आहे. कपलिंग तुटल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. जखमी झालेल्या प्रवाशांची प्रकृती स्थिर असून सुदैवाने कोणत्याही प्रवाशाला गंभीर दुखापत झालेली नाही, असे डॉक्टरांनी सांगितले.

अपघाताचे वृत्त समजताच पोलीस आणि रेल्वेचे पथक घटनास्थळी पोहोचले. अपघातग्रस्त एक्स्प्रेसमधील प्रवाशांसाठी ट्रेनची व्यवस्था करण्यात आली आहे. अपघातामुळे अलाहाबाद- कानपूर या मार्गावरील रेल्वे वाहतूक बंद असून 11 एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे ऐन गर्दीच्या मोसमात प्रवाशांचे हाल झाले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2019 7:55 am

Web Title: uttar pradesh kanpur 12 coaches of poorva express derail several passenger injured
Next Stories
1 शरद पवार-मोहिते संघर्षांला अखेर तोंड फुटले..
2 बापट यांच्या घोषणेमुळे आमदारांची परीक्षा
3 दादांच्या उत्साहाला कार्यकर्त्यांची साथ
Just Now!
X