News Flash

Uttar Pradesh CM announcement: यूपीच्या मुख्यमंत्रीपदी योगी आदित्यनाथांच्या नावाची घोषणा

सगळीकडे आश्चर्य व्यक्त

योगी आदित्यनाथ

अखेर देशाच्या सर्वात मोठ्या राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची माळ योगी आदित्यनाथ यांच्या गळ्यात पडली आहे. भाजपच्या ३१२ नवनिर्वाचित आमदारांची लखनौमधल्या ‘लोकभवन’मधली बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. आमदारांची ही बैठक भाजपचे ज्येष्ठ नेते वैंकय्या नायडू यांच्या अध्यक्षतेखाली झाली. केशव प्रसाद मौर्य आणि दिनेश शर्मा यांना उप-मुख्यमंत्री बनवण्यात आले आहे. दोन उप-मुख्यमंत्री असलेले उत्तर प्रदेश हे एकमेव राज्य ठरले आहे.

उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदासाठी मनोज सिन्हा, केशव प्रसाद मौर्य आणि दिनेश शर्मा यांची नावे चर्चेत होती.  मनोज सिन्हांचं पारडं जड मानलं जात होतं. पण योगी आदित्यनाथ यांचं नाव अचानकपणे पुन्हा चर्चेत आलं आहे आणि त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.

दरम्यान योगी आदित्यनाथ, केशव प्रसाद मौर्य, भूपेंद्र यादव, ओम माथुर, आणि सुनील बन्सल या भाजप नेत्यांनी विधिमंडळ पक्षाच्या बैठकीआधी वेगळी बैठक घेतल्याचं वृत्त एएनआय ने दिले होते.  योगी आदित्यनाथ यांची प्रतिमा जहाल हिंदुत्त्ववादी अशी आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 18, 2017 4:51 pm

Web Title: uttar pradesh live updates bjp cm candidate manoj sinha rajnath singh keshav prasad maurya amit shah narendra modi
Next Stories
1 ‘तिहेरी तलाक’ला विरोध वाढला; याचिकेवर १० लाखांवर मुस्लिमांच्या स्वाक्षऱ्या
2 शेतकऱ्यांचे खरे कैवारी असाल तर अर्थसंकल्प शांतपणे ऐकून घ्या; मुख्यमंत्र्यांचे विरोधकांना आवाहन
3 Agra blasts: आग्र्यात दोन ठिकाणी स्फोट
Just Now!
X