प्रेमात सर्वकाही माफ असतं. मात्र प्रेमात कधी कोण काय करेल? काहीही सांगत येत नाही. याची प्रचिती उत्तर प्रदेशातील भदोही जिल्ह्यातील जनपदमधील गोपीचंद भागात आली. एक युवक नवऱ्या मुलीचे कपडे परिधान करुन प्रेयसीच्या घरी तिला भेटण्यासाठी गेला होता. मात्र वऱ्हाडी मंडळीला याबाबतची शंका आणि त्याचं पितळ उघडं पडलं. या बाबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

नवरीच्या वेषात लग्नसोहळ्यात आल्याने सुरुवातीला वऱ्हाडी मंडळीला शंका आली नाही. त्यांना वाटलं नवऱ्या मुलीला भेटण्यासाठी तिची मैत्रिण आली आहे. तो वारंवार मुलीच्या खोलीत डोकावून पाहात होता. मात्र त्याच्या वागणं संशयास्पद वाटल्याने कुटुंबियांनी चौकशी केली. त्यानंतर घरातील महिलांनी बाहेर असलेल्या लोकांना बोलवलं आणि त्याचं बिंग फुटलं. त्याने हातात बांगड्या, माथ्यावर बिंदी आणि खोटे केस लावले होते. त्या युवकाने पूर्णपणे महिलांचा श्रृंगार केला होता. तसेच लग्न मंडपातील मंडळींशी मुलींच्या आवाजात संवाद साधत होता.

त्याला पकडल्यानंतर डोक्यावरील पदर हटवला गेला. त्यानंतर मुलीच्या वेशात युवक असल्याचं स्पष्ट झालं. त्याला काही जणांनी चोपही दिला. तर काही जणांनी त्याचा व्हिडिओ शूट केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. त्या व्हिडिओत त्याचा श्रृंगार काढून खरं रुप दाखवलं जात आहे.

‘…तर तुमचं व्हॉट्सअ‍ॅप खातं बंद होईल’

त्याला पकडल्यानंतर मांडवाबाहेर आणण्यात आलं. मात्र तिथे आधीच दबा धरून असलेले त्याचे मित्र त्याला मोटारसायकलवरून घेऊन फरार झाले. या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नाही.