18 January 2019

News Flash

धक्कादायक! बदला घेण्यासाठी शेजाऱ्याने केला आठ वर्षांच्या मुलीवर बलात्कार

उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी येथे राहणाऱ्या छोटेलालचा त्याच्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीशी वाद झाला होता. त्या दोघांनी एका जमिनीचा व्यवहार केला होता.

संग्रहित छायाचित्र

शेजारी राहणाऱ्या कुटुंबाशी आर्थिक कारणावरुन झालेल्या वादाचा बदला घेण्यासाठी एका नराधमाने त्या कुटुंबातील आठ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली. बलात्कारानंतर नराधमाने त्या चिमुरडीची हत्या करुन तिचा मृतदेह निर्जनस्थळी फेकून दिला. या प्रकरणी पोलिसांनी नराधम छोटेलाल याला अटक केली आहे.

उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी येथे राहणाऱ्या छोटेलालचा त्याच्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीशी वाद झाला होता. त्या दोघांनी एका जमिनीचा व्यवहार केला होता. शेजारी राहणाऱ्याने त्या व्यवहारात मिळालेल्या पैशांचे समान वाटप केले नाही, असे छोटेलालचे म्हणणे होते. यावरुन दोघांमध्ये वाद होता. या वादाचा बदला घेण्यासाठी छोटेलालने शेजारी राहणाऱ्याच्या मुलीचे अपहरण केले. रविवारी संध्याकाळी त्याची आठ वर्षांची मुलगी घराबाहेर खेळत होती. यादरम्यान छोटेलालने तिला गाठले आणि तिला निर्जनस्थळी नेले. त्याने पीडित मुलीवर बलात्कार केला आणि यानंतर गळा आवळून तिची हत्या केली.

सोमवारी सकाळी ग्रामस्थांना तिचा मृतदेह आढळला. घटनेनंतर छोटेलालही पसार झाल्याने मुलीच्या कुटुंबीयांनी त्याच्यावरच संशय व्यक्त केला. अखेर सोमवारी रात्री पोलिसांनी छोटेलालला जिल्ह्यातील बस स्थानकावरुन अटक केली. छोटेलालला अटक केली त्यावेळी तो मद्यधूंद अवस्थेत होता. त्याला घडलेल्या गुन्ह्याबाबत पश्चातापही नव्हता,  असे पोलिसांनी सांगितले.

First Published on June 14, 2018 6:26 am

Web Title: uttar pradesh man rapes killed 8 year old girl to teach lesson to her dad in lakhimpur kheri