21 April 2019

News Flash

विकृतीचा कळस! तीन वर्षांच्या मुलीच्या तोंडात फोडला सुतळी बॉम्ब

मुलीचे वडील शशी कुमार यांनी पोलिसांकडे तक्रार दिली असून यात त्यांनी गावात राहणाऱ्या हरीपाल या तरुणाने हे कृत्य केल्याचे म्हटले आहे.

प्रतिकात्मक छायाचित्र

उत्तर प्रदेशमधील मेरठ येथे एका तरुणाने तीन वर्षांच्या मुलीच्या तोंडात सुतळी बॉम्ब फोडल्याची संतापजनक घटना घडली आहे. मुलीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु असून तिची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

‘हिंदुस्तान टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार मेरठ जिल्ह्यातील मिलाक गावात राहणारी तीन वर्षांची मुलगी मंगळवारी संध्याकाळी घराबाहेर खेळत होती. यादरम्यान गावातील एका तरुणाने तिच्या तोंडात सुतळी बॉम्ब ठेवला आणि तो पेटवून दिला. सुतळी बॉम्ब तोंडातच फुटल्याने मुलीच्या चेहऱ्याला ५० टाके पडले असून तिच्या घशाला संसर्ग झाला आहे. तिची प्रकृती सध्या गंभीर आहे, असे डॉक्टरांनी सांगितले.

मुलीचे वडील शशी कुमार यांनी पोलिसांकडे तक्रार दिली असून यात त्यांनी गावात राहणाऱ्या हरीपाल या तरुणाने हे कृत्य केल्याचे म्हटले आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू आहे. या घटनेने ग्रामस्थांनी संतापाचे वातावरण असून  आरोपीला कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी केली जात आहे.

First Published on November 8, 2018 12:34 pm

Web Title: uttar pradesh man sets off diwali cracker in 3 year olds mouth in meerut