28 November 2020

News Flash

‘प्रजासत्ताक दिनाचे वर्ष कितवे हेदेखील या मंत्र्यांना ठाऊक नाही’

अशा मंत्र्यांना म्हणायचे तरी काय?

फोटो सौजन्य-एएनआय

६९ वा प्रजासत्ताक दिन देशभरात साजरा करण्यात आला. अत्यंत उत्साहात आणि आनंदात हा दिवस पार पडला. मात्र उत्तर प्रदेशचे एक मंत्री दहा वर्षे मागे आहेत असेच दिसून आले. उत्तर प्रदेशचे मंत्री संदीप सिंग यांनी चक्क त्यांच्या भाषणात आज ५९ वा प्रजासत्ताक दिन आहे असे म्हटले. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने या संदर्भातले वृत्त दिले आहे. आपण सगळे भारतीय ५९ वा गणतंत्र दिवस साजरा करण्यासाठी एकत्र आलो आहोत. देशातील महापुरुषांना अभिवादन करण्याचा हा दिवस आहे असेही त्यांनी त्यांच्या भाषणात म्हटले आहे. मंत्रिपदावर पोहचलेल्या माणसालाही आज देशाचा कितवा गणतंत्र दिवस आहे हे ठाऊक असू नये? ही बाब जनतेला अचंबा वाटणारीच आहे.

२६ जानेवारी १९४९ रोजी संविधान स्वीकारण्यात आले आणि १९५० पासून ते अंमलात आणले गेले. त्याचमुळे हा दिवस गणतंत्र दिवस म्हणून साजरा केला जातो. म्हणजेच संविधान स्वीकारून आपल्याला ६८ वर्षे पूर्ण झाली आणि आज देशाचा गणतंत्र दिवस आहे. मात्र उत्तर प्रदेशचे मंत्री संदीप सिंग यांनी आज ५९ वा प्रजासत्ताक दिवस आहे असे जाहीर करून महापुरुषांना अभिवादन केले. आता अशा नेत्यांना काय म्हणावे हा प्रश्नच जनतेला नक्की पडला असेल.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2018 6:06 pm

Web Title: uttar pradesh ministermos education sandeep singh said we are celebrating indias 59th republicday
Next Stories
1 झेंडावंदनादरम्यान पोलीस हवालदाराची आत्महत्या
2 अशोक चक्र प्रदान करताना राष्ट्रपती रामनाथ कोविंद भावुक
3 प्रजासत्ताक दिनी भाजपाविरोधात विरोधकांची मुंबईत ‘संविधान बचाव रॅली’
Just Now!
X