उत्तर प्रदेशातील भाजपा आमदार सुरेंद्र सिंह पुन्हा एकदा आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. ज्या मुस्लिमांना अनेक बायका असतात तसंच मोठ्या प्रमाणात मुलं असतात त्यांची वृत्ती प्राण्यांची असते असं धक्कादायक वक्तव्य सुरेंद्र सिंह यांनी केलं आहे. सुरेंद्र सिंह यांच्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
राहुल गांधी रावण तर प्रियंका शूर्पणखा: भाजपा आमदार
“मुस्लिम धर्मात लोक ५० बायका ठेवतात तसंच १०५० मुलांना जन्माला घालतात. ही कोणतीही परंपरा नसून पशू प्रवृत्ती आहे. समाजात दोन ते चार मुलांना जन्म देणं सामान्य समजलं जातं”, असं सुरेंद्र सिंह यांनी म्हटलं आहे. सुरेंद्र सिंह यांनी वादग्रस्त वक्तव्य करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही त्यांनी अनेकदा वादग्रस्त वक्तव्यं केली असून चर्चेत आले आहेत.
#WATCH Surendra Singh, BJP MLA from Ballia: In Muslim religion, you know that people keep 50 wives and give birth to 1050 children. This is not a tradition but an animalistic tendency. (14.07.2019) pic.twitter.com/i3AJa9ZSxw
— ANI UP (@ANINewsUP) July 15, 2019
गतवर्षी जुलै महिन्यात त्यांनी हिंदुत्व टिकवून ठेवायचं असेल तर प्रत्येक हिंदू दांपत्याला किमान पाच मुलं असली पाहिजेत असं म्हटलं होतं. देशात हिंदूंची संख्या वाढवण्यासाठी हे गरजेचं असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. “प्रत्येक अध्यात्मिक गुरुची इच्छा आहे की, प्रत्येक दांपत्याला किमान पाच मुलं असली पाहिजेत. अशाने लोकसंख्या नियंत्रित राहिल आणि हिंदुत्वही टिकेल”, असं त्यांनी सांगितलं होतं.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 15, 2019 12:32 pm