उत्तर प्रदेशमधील पिलीभितमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका १२ वर्षीय मुलीचा गावातील भटक्या कुत्र्यांनी जीव घेतला. कुत्र्यांनी या मुलीवर हल्ला करुन तिच्या शरीराचे लचके तोडले. ही मुलगी घरामागील शेतामध्ये कोथिंबीर आणण्यासाठी गेली असता भटक्या कुत्र्यांनी तिच्यावर हल्ला केला. या घटनेची माहिती मिळताच गावामध्ये एकच गोंधळ उडाला आणि घटनास्थळी गावकऱ्यांची गर्दी झाली. या संदर्भातील माहिती जहानाबाद पोलीस स्थानकामध्ये कळवल्यानंतर पोलिसांनाही घटनास्थळी धाव घेतली.

नक्की वाचा >> उत्तर प्रदेश : दोन वर्षापूर्वी चोरीला गेलेली Wagon R पोलीस अधिकाऱ्याकडेच सापडली; एका कॉलमुळे झाला भांडाफोड

पिलीभितमधील जहानाबाद पोलीस स्थानकाच्या हद्दीत येणाऱ्या बगुवा गावामध्ये हा सर्व धक्कादायक प्रकार घडला. येथे राहणारी १२ वर्षीय नेहा नावाची मुलगी आपल्या घरातील व्यक्तींच्या सांगण्यानुसार जवळच्याच शेतामधून स्वयंपाकासाठी कोथिंबीर आणायला गेली होती. नेहा एकटीच या शेतामध्ये गेली होती. या मुलीला एकटं पाहून कुत्र्यांनी तिच्यावर हल्ला केला. गावकऱ्यांपैकी एका व्यक्तीने शेतामध्ये अनेक कुत्र्यांना पाहिल्यानंतर त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली आणि त्याने शेताच्या दिशेने धाव घेतल्याचं न्यूज १८ ने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. ही व्यक्ती शेतात पोहचली तेव्हा हे कुत्रे या मुलीच्या अंगाचे लचके तोडत होते. त्या व्यक्तीने बरेच प्रयत्न करुन कुत्र्यांना मुलीपासून दूर पळवले. मात्र तोपर्यंत बराच उशीर झाला होता. कुत्र्यांनी लचकले तोडल्याने या मुलीचा शेतातच मृत्यू झाला. तिचं संपूर्ण अंग रक्ताने माखलं होतं.

नक्की वाचा >> अभ्यासावरुन पालक ओरडल्याने १४ वर्षीय मुलाने घरातील दीड लाख चोरले अन् गोवा गाठले; क्लबमध्ये पैसे उडवले पैसे

गावातील चौकीदार असणाऱ्या राजेशनेच या मुलीला वाचवण्याचा प्रयत्न केला. शेतामध्ये काही कुत्रे एका मुलीला त्रास देत असल्याने पाहून मी शेतात धाव घेतली. मी हातातील काठीने कुत्र्यांना पळवलं. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. मुलीने शेतामध्येच प्राण सोडले होते, असं राजेशने सांगितलं. राजेशनेच गावातील इतर व्यक्तींना फोन करुन यासंदर्भातील माहिती दिल्यानंतर ही बातमी गावात वाऱ्याच्या वेगाने पसरली आणि शेतात बघ्यांची गर्दी झाली. पोलिसांनाही घटनास्थळी धाव घेत मुलीचा मृतदेह ताब्यात घेऊ तो शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

नक्की वाचा >> उत्तर प्रदेश: पाकिस्तानी महिलेची ग्रामपंचायत प्रमुखपदी निवड; वर्षभरानंतर प्रशासनाला आली जाग

पिलीभित जिल्ह्यामध्ये अशाप्रकारे भटक्या कुत्र्यांनी अनेक मुलांचा जीव घेतला आहे. काही महिन्यांपूर्वी बीसलपूर पोलीस स्थानकाच्या हद्दीमध्ये एका १० वर्षीय मुलाचे भटक्या कुत्र्यांनी लचके तोडले होते. भटक्या कुत्र्यांबद्दल येथील स्थानिक जिल्हा प्रशासन आणि नगरपालिकेतील विभाग गांभीर्याने निर्णय घेत नाही असा आरोप सर्वसामान्य नागरिक करतात.

नक्की वाचा >> उत्तर प्रदेश : वर्गात बसण्याच्या जागेवरुन झालेल्या वादातून मित्रावर झाडल्या गोळ्या; १४ वर्षीय मुलाचा मृत्यू