17 January 2021

News Flash

नात्याला काळीमा! मोठ्या भावाचा विवाहित बहिणीवर बलात्कार, व्हिडीओही बनवला

वाच्यता केल्यास व्हिडीओ व्हायरल करण्याची दिली धमकी

संग्रहित छायाचित्र/इंडियन एक्स्प्रेस

दररोज हादरवून टाकणाऱ्या महिला अत्याचाराच्या घटना कानावर आदळत असताना बहिण-भावाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. वयाने लहान असलेल्या विवाहित बहिणीवर मोठ्या भावानं बलात्कार केल्याची संतापजनक घटना उत्तर प्रदेशातील मोरादाबादमध्ये घडली आहे. विकृतीचा कळस म्हणजे याचा व्हिडीओ तयार करून वाच्यता केल्यास व्हायरल करण्याची धमकीही दिली. सतत छळ होत असल्यानं पीडितेने पोलिसांत धाव घेतली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना २३ डिसेंबर रोजी घडली आहे. पीडित महिलेचा पती बाहेर असताना मोठा भाऊ तिच्या घरी आला. त्यावेळी तो मद्याधुंद अवस्थेत होता. यावेळी त्याच्यासोबत मद्यपान केलेला मित्रही होता. बहीण एकटी असल्याचं बघून भावाने तिच्या बलात्कार केला. तर त्याच्या मित्रानं व्हिडीओ शूट केला. त्यानंतर झालेल्या प्रकाराची कुणाकडे वाच्यता केल्यास व्हिडीओ इंटरनेटवर अपलोड करण्याची धमकी दिली.

आणखी वाचा- विकृती! प्रियकरानेच चार मित्रांच्या सहाय्याने आळीपाळीने केला बलात्कार, घटनेचा व्हिडीओ व्हायरल

या घटनेनंतर भावाचं हीन कृत्य थांबलं नाही. त्यानंतर तो पीडितेवर लक्ष ठेवायचा तसेच छळही करू लागला. तर दुसरीकडे पीडितेचे आईवडिलही तिच्या पोलिसात न जाण्यासाठी दबाव आणू लागले. त्यामुळे पीडितेचा संयम सुटला आणि तिने पोलीस ठाणे गाठत घडलेला प्रकाराची माहिती पोलिसांना दिली. महिलेनं तक्रार दिल्यानंतर मोरादाबाद पोलिसांनी सोमवारी पीडितेचा भाऊ व त्याच्या मित्राविरुद्ध गुन्हा दाखल केला.

आणखी वाचा- पाटणा हादरलं! इंडिगोच्या मॅनेजरची गोळ्या घालून हत्या

“ही घटना घडल्यानंतर आपण पतीला सांगितलं. त्यानंतर आम्ही पोलिसांत तक्रार करण्याचा निर्णय घेतला. पण, कुटंबीयांनी सामाजातील प्रतिष्ठा खराब होईल, असं सांगत तक्रार न करण्यासाठी दबाव टाकला. मात्र, आरोपी भाऊ घराच्या परिसरातच फिरायला लागला. तसेच छळ करू लागला आणि धमकी देऊ लागला. त्यामुळे आम्ही पोलिसात तक्रार केली,” असं महिलेनं फिर्यादीत म्हटलं आहे. “मुख्य आरोपीसह त्यांच्या मित्राविरुद्ध बलात्कार आणि धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सध्या फरार असून, लवकरच त्यांना अटक करण्यात येईल,” असं सिव्हील लाईन पोलीस ठाण्याचे प्रमुख दर्वेश कुमार यांनी सांगतिलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 13, 2021 1:39 pm

Web Title: uttar pradesh shocker incident rape crime sister raped by elder brother act filmed by friend bmh 90
Next Stories
1 “कृषी कायद्याला विरोध नाही हे तर CAA, NRC, राम मंदिर उभारलं जात असल्याचं दुख:”; भाजपा खासदाराचा हल्लाबोल
2 ‘गोडसे ज्ञानशाळा’ दोन दिवसांतच बंद, प्रशासनाने ठोकले टाळे; साहित्य-पोस्टर्स केले जप्त
3 छत्तीसगड : ५ लाखांचा इनाम असलेल्या नक्षलवाद्याचा खात्मा
Just Now!
X