20 September 2020

News Flash

क्लासला जाणाऱ्या तरुणीचे अपहरण करुन सामूहिक बलात्कार

पीडितेची प्रकृती सध्या स्थिर असून आरोपींचा शोध सुरु असल्याचे माहिती पोलीस अधीक्षक प्रशांत वर्मा यांनी दिली. 

संग्रहित छायाचित्र

उत्तर प्रदेशमध्ये महिलांच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित करणारी घटना आग्रा येथे घडली आहे. क्लासला जाण्यासाठी निघालेल्या विद्यार्थिनीचे अपहरण करुन तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

आग्रा येथे राहणारी पीडित मुलगी महाविद्यालयात प्रथम वर्षात शिकते. पीडित तरुणी क्लासला जात असताना दोन अज्ञात व्यक्तींनी तिचे अपहरण केले आणि यमुना नदी किनारी एका घाटावर तिला नेले. तेथील निर्जनस्थळी तिघांनी पीडितेवर बलात्कार केला. नराधमांनी पीडितेला तिथेच सोडून पळ काढला. शेवटी एका स्थानिकाच्या मदतीने पीडितेने घर गाठले. घरी परतल्यावर तिने आई- वडिलांना घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. पीडित तरुणीला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून या प्रकरणी न्यू आग्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेची प्रकृती सध्या स्थिर असून आरोपींचा शोध सुरु असल्याचे माहिती पोलीस अधीक्षक प्रशांत वर्मा यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 19, 2018 10:50 am

Web Title: uttar pradesh student on her way to coaching class abducted and gangraped in agra
Next Stories
1 पाकिस्तानी तुरुंगातून सुटका झाल्यानंतर सहा वर्षांनी हमीद अन्सारी दिल्लीत दाखल
2 बँक कर्मचाऱ्यांचा संप, पाच दिवस बँका बंद
3 मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या
Just Now!
X