उत्तर प्रदेशच्या ७५ जिल्ह्यामंध्ये चार टप्प्यांमध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल समोर आले आहेत. या निवडणुकीत भाजपा, कॉँग्रेस, समाजवादी पक्ष आणि एमआएमने आपली ताकद पणाला लावली होती. दरम्यान, निकालाच्या दिवशी प्रयागराजमध्ये चक्क टॉसद्वारे एका गावच्या प्रमुखाची निवड करण्यात आली आहे.

उत्तर प्रदेशच्या सोराव येथील करोदी गावात मतमोजणी नंतर समान दोन्ही उमेदवारांना समान मते मिळाल्यानंतर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. दोन्ही उमेदवारंना एकसारखीच मते मिळाल्याने गावचा प्रमुख कोण हा प्रश्न उपस्थित झाला होता. बराच वेळ निकाल हाती न आल्याने गावात तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर अधिकाऱ्यांच्या मध्यस्तीने अंतिम विजयी उमेदवार निवडण्यात आला.

सोराव येथील करोदी गावात ग्रामपंचायत निवडणूक भुंवरलाल आणि राज बहादूर या दोघांनाही १७० अशी समान मते मिळाली होती. बऱ्याच वेळानंतर चर्चेअंती दोन्ही उमेदवारांच्या सहमतीने टॉस करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर निवडणूक अधिकाऱ्याने दोन्ही उमेदवारांच्या उपस्थितीत टॉस केला गेला. त्यामध्ये भुंवरलालच्या बाजूने निकाल लागला आणि गावचे प्रमुख पद हाती आहे. पहिल्यांदाच उत्तर प्रदेशात अशा प्रकारे टॉस करुन निकाल देण्यात आला आहे.