07 March 2021

News Flash

अब्रू वाचवण्यासाठी महिलेचा दुर्गावतार; नराधमाचे कापले गुप्तांग 

बसरेहर तालुक्यातील गावात राहणारी महिला मंगळवारी रात्री घरी एकटीच होती. यादरम्यान रात्रीच्या अंधारात एक नराधम तिच्या घरात घुसला.

प्रतिकात्मक छायाचित्र

बलात्कार करण्यासाठी घरात घुसलेल्या नराधमापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी एका महिलेने दुर्गावतार घेतला. महिलेने नराधमाला घरातील एका खांबाला बांधले आणि नंतर त्याचे गुप्तांगच कापल्याची घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली.

‘नवभारत टाइम्स’च्या वृत्तानुसार बसरेहर तालुक्यातील गावात राहणारी महिला मंगळवारी रात्री घरी एकटीच होती. यादरम्यान रात्रीच्या अंधारात एक नराधम तिच्या घरात घुसला. त्याने पीडित महिलेला पकडले देखील होते. मात्र, महिलेने धाडस दाखवत त्याला प्रतिकार केला. इतकच नव्हे त्या नराधमाला घरातील खांबाला बांधले आणि त्यानंतर घरातील चाकूने त्याचे गुप्तांग कापले. यानंतर महिलेने पोलिसांना फोन करुन घडलेल्या प्रकाराची माहिती दिली.

पोलिसांनी नराधमाला सैफईतील रुग्णालयात दाखल केले असून रात्री उशिरा महिलेने त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी नराधमाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 2, 2018 11:08 am

Web Title: uttar pradesh woman cut penis of man after he tried to rape her
Next Stories
1 धक्कादायक! जगातील सर्वाधिक २० प्रदूषित शहरांपैकी १४ शहरं भारतातच
2 UPSC results: मदरशातील शिक्षकाची यशोगाथा, जिंकली केंद्रीय लोकसेवा आयोगाची शर्यत
3 योगी आदित्यनाथांच्या मंत्र्याचा दलिताच्या घरी हॉटेलच्या जेवणावर ताव
Just Now!
X