22 October 2020

News Flash

सामूहिक बलात्कारानंतर महिलेला मंदिराच्या आवारात जिवंत जाळले

पाचही नराधम हे महिलेचे नातेवाईकच आहेत. अरम सिंह (वय ३०), महावीर (वय ४५), चरण सिंह (वय २०), गुल्लू (वय २१) आणि भोना उर्फ उमर पाल

संग्रहित छायाचित्र

उत्तर प्रदेशमधील संभल येथे ३५ वर्षांच्या महिलेवर पाच नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना शनिवारी घडली. बलात्कारानंतर नराधमांनी महिलेला मंदिराच्या आवारात जिवंत जाळले असून पाचही आरोपी हे महिलेचे नातेवाईक आहेत.

संभलमधील राजापूरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारी ३५ वर्षांची महिला शनिवारी रात्री तिच्या घरी झोपली होती. तिची सात वर्षांची मुलगी देखील घरातच होती. रात्री दोनच्या सुमारास आरोपी महिलेच्या घरात घुसले. त्यांनी महिलेला फरफटत घराबाहेर काढले. यानंतर तिला घरालगतच्या मंदिराच्या आवारात नेत तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. बलात्कारानंतर तिला जाळून आरोपींनी घटनास्थळावरुन पळ काढला. या घटनेत महिलेचा मृत्यू झाला आहे. महिलेने पोलीस नियंत्रण कक्षाला फोन केला होता. मात्र, तिथून काहीच प्रतिसाद मिळाला नाही, असा आरोप महिलेच्या पतीने केला आहे. महिलेचा पती गाझियाबादमध्ये रोजंदारीवर काम करतो.

पाचही नराधम हे महिलेचे नातेवाईकच आहेत. अरम सिंह (वय ३०), महावीर (वय ४५), चरण सिंह (वय २०), गुल्लू (वय २१) आणि भोना उर्फ उमर पाल (वय २२) अशी या आरोपींची नावे आहेत. ‘आरोपींनी महिलेला जाळल्याचे शवविच्छेदनातून स्पष्ट झाले आहे. मात्र, महिलेवर बलात्कार झाला होता की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. फॉरेन्सिक चाचणीनंतरच हे स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले. घटनेनंतर आरोपी पसार झाले असून त्यांचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी नमूद केले. या प्रकरणात पोलीस अधीक्षकांनी एक पोलीस उपनिरीक्षक आणि दोन कॉन्स्टेबलवर निलंबनाची कारवाई केली आहे. कामात हलगर्जीपणा केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 16, 2018 10:28 am

Web Title: uttar pradesh woman gangraped burnt alive in temple premises in sambhal
Next Stories
1 मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्ग ठप्प
2 मंदिरांवर चर्चा करुन रोजगार निर्मिती होणार नाहीये – सॅम पित्रोदा
3 परराज्यातून येणाऱ्या माशांत फॉर्म्यलिन असल्याची अफवा
Just Now!
X