News Flash

मद्यपी पतीची लाटण्याने मारुन केली हत्या

गौरीप्रसादला दारुचे व्यसन असून यावरुन पती- पत्नीमध्ये दररोज भांडण व्हायचे.

प्रतिकात्मक छायाचित्र

मद्यपी पतीकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून एका महिलेने सोमवारी रात्री टोकाचे पाऊल उचलले. मद्यपी पतीला लाटण्याने बेदम मारहाण करुन त्याची हत्या केल्याची घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली असून या प्रकरणी पोलिसांनी महिलेसह तिच्या अल्पवयीन मुलीला देखील अटक केली आहे.

आंबेडकरनगर जिल्ह्यातील हुसैनबाद खानपूर या गावात गौरीप्रसाद राजभर (वय ५०) आणि त्याची पत्नी सुमित्रा (वय ४५) हे दाम्पत्य राहतात. या दाम्पत्याला एक अल्पवयीन मुलगी देखील आहे. गौरीप्रसादला दारुचे व्यसन असून यावरुन पती- पत्नीमध्ये दररोज भांडण व्हायचे. सोमवारी रात्री देखील गौरीप्रसाद मद्यपान करुन घरी गेला. यामुळे सुमित्रा संतापली. यावरुन पती- पत्नीमध्ये पुन्हा वाद झाला. गौरीप्रसादने तिला शिवीगाळ करायला सुरुवात केली. संतापलेल्या सुमित्राने लाटण्याने पतीला बेदम मारहाण केली. भांडणाचा आवाज ऐकून राजभर यांचे नातवाईकही त्यांच्या घरात पोहोचले. त्यांनीच मारणाहीत डोक्याला गंभीर दुखापत झालेल्या गौरीप्रसादला रुग्णालयात दाखल केले.  उपचारादरम्यान  गौरीप्रसादचा मृत्यू झाला.

झैदपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेद्रसिंह म्हणाले, आम्ही गौरीप्रसादच्या बहिणीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे सुमित्रा व तिच्या मुलीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या दोघांनाही अटक करण्यात आली असून मुलगी अल्पवयीन असल्याने तिची रवानगी बालसुधार गृहात करण्यात आली, असे त्यांनी सांगितले. महिलेविरोधात हत्येचा गुन्हा दाखल होणार नाही. सदोष मनोष्यवधाप्रकरणी तिच्यावर गुन्हा दाखल केला जाईल. अत्याचाराला कंटाळून तिचा संयम संपला होता आणि यातूनच ही घटना घडली, असे पोलिसांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 4, 2018 1:34 pm

Web Title: uttar pradesh woman killed husband using rolling pin in ambedkarnagar district
Next Stories
1 कर्नाटकातील निवडणुकीत भगवान हनुमानच अडकले अाचारसंहितेच्या कचाटयात
2 जाणून घ्या यापूर्वी कधी कधी झाला पत्रकारांना काबूत ठेवण्याचा सरकारी प्रयत्न
3 ‘काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रद्द करता येणार नाही’
Just Now!
X