20 January 2021

News Flash

भाजपा नेत्याच्या मुलाचा भीषण अपघातात मृत्यू, कारचा अक्षरश: चेंदामेंदा

ट्रकला धडक होऊन हा भीषण अपघात झाला

उत्तराखंडमधील भाजपा नेते अरविंद पांडे यांच्या मुलाचा कार अपघातात मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यात झालेल्या अपघातात अंकुर पांडे याचा मृत्यू झाला. फरिदापूरजवळ झालेला हा अपघात इतका भीषण होता की, कारचा अक्षरश: चेंदामेंदा झाला होता. ट्रकला धडक होऊन हा भीषण अपघात झाला.

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, फरिदापूरजवळ राष्ट्रीय महामार्ग २४ वर हा भीषण अपघात झाला. अंकुर पांडे प्रवास करत असलेल्या कारने ट्रकला धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला. या अपघातात अजून दोघांचा मृत्यू झाला असून, एकजण जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्वजण गोरखपूर येथे एका लग्न समारंभारत उपस्थित राहण्यासाठी चालले होते.

अरविंद पांडे हे भाजपाचे मंत्री असून उत्तराखंड सरकारमध्ये शाळा व संस्कृत शिक्षण, क्रिडा, युवा कल्याण आणि पंचायती राज मंत्री आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 26, 2019 11:59 am

Web Title: uttarakhand bjp leader arvind pandey son ankur pandey died in car accident sgy 87
Next Stories
1 ‘मला अध्यक्षपद नकोच!’, राहुल यांची समजूत घालण्याचे UPA चे प्रयत्न अयशस्वी
2 …म्हणून ‘पद्मश्री’ पुरस्कार विजेत्या शेतकऱ्यावर आली मुंग्यांची अंडी खाऊन जगण्याची वेळ
3 धक्कादायक! दहा वर्षांत २१ शहरं होणार पाण्याला मौताद
Just Now!
X