News Flash

भाजपा आमदाराचा हातात दारु आणि बंदुका घेऊन डान्स, व्हिडीओ व्हायरल

भाजपाने या व्हिडीओची गांभीर्याने दखल घेतली आहे

उत्तराखंडमधील वादग्रस्त भाजपा आमदार प्रणव सिंह चॅम्पिअन पुन्हा एकदा चर्चेत आहेत. बेशिस्त आणि गैरवर्तवणुकीमुळे आधीच ते पक्षातून निलंबित आहेत. मात्र यावेळी ते चर्चेत येण्याचं कारण कोणताही बेशिस्तपणा किंवा हिंसाचार नाही आहे. तर हातात दारु आणि बंदूक घेऊन बॉलिवूडच्या गाण्यावर डान्स केल्याने ते सध्या चर्चेत आले आहेत. त्यांचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडीओत प्रणव सिंह हातात बंदूक घेऊन नाचताना दिसत आहेत. यावेळी ते अश्लिल भाषेचा वापर करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पायाचं ऑपरेशन यशस्वीपणे पार पडल्यानंतर प्रणव सिंह आपल्या घरी परतले होते. आपल्या समर्थकांसह याचाच आनंद ते साजरा करत होते. नाचताना प्रणव सिंह यांनी एक, दोन नाही तर चार बंदुका हातात घेतल्या होत्या.

यावेळी त्यांचे समर्थकही कौतुक करताना ऐकू येत आहे. उत्तराखंडमध्ये हे फक्त तुम्हीच करु शकता असं ते म्हणत आहेत. आपल्या समर्थकांना उत्तर देताना फक्त उत्तराखंड नाही, तर संपुर्ण भारतात असं कोणी करु शकत नाही असं म्हणतात.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपाने प्रणव सिंह यांच्या व्हिडीओची गांभीर्याने दखल घेतली आहे. सध्या त्यांच्यावर तीन महिन्यांच्या निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. चर्चा करुन काय कारवाई करता येईल यासंबंधी निर्णय घेण्यात येणार आहे. काही महिन्यांपुर्वी प्रणव सिंह यांचा एका पत्रकाराला जीवे मारण्याची धमकी देणारा व्हिडीओ व्हायरल झाला होता. यासंबंधी पत्रकाराने पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली होती. उत्तराखंडचे भाजपा प्रदेशाध्यक्ष नरेश बन्सल यांनी तक्रारीची दखल घेत प्रणव सिंह यांचं तीन महिन्यांसाठी सदस्यत्व रद्द केलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 10, 2019 12:14 pm

Web Title: uttarakhand bjp mla pranav singh champion dance flashing guns video viral sgy 87
Next Stories
1 गोवा सरकार लग्नापूर्वी HIV चाचणी बंधनकारक करण्याच्या विचारात
2 मोदींविरोधात बोलल्यानेच माझ्या पतीला जन्मठेपेची शिक्षा, संजीव भट्ट यांच्या पत्नीचा आरोप
3 जम्मू-काश्मीर: फुटिरतावादी अंद्राबीचे घर सील; टेरर फंडिंगप्रकरणी NIAची कारवाई
Just Now!
X