News Flash

उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांना दिल्लीतील ‘एम्स’मध्ये हलवले

काही दिवसांपूर्वीच त्यांचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता

संग्रहीत

उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांची प्रकृती खालवल्याची माहिती समोर आली असून, आता त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात नेण्यात येत आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे.

काही दिवस अगोदर मुख्यमंत्री रावत हे करोना पॉझिटिव्ह असल्याचं आढळून आलं होतं. जीटीसी हॅलीपॅडवरून त्यांना दिल्लीकडे रवाना करण्यात आलं आहे. प्रकृती खराब झाल्याने रविवारी सायंकाळी त्यांना डेहराडून येथील दून वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आलं होतं. त्या ठिकाणी रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांनी रावत यांच्या फुफुसांचे सीटी स्कॅन केले गेले होते, ज्यामध्ये थोडेफार इंफेक्शन झाल्याचं दिसून आलं होतं.

तर, मुख्यमंत्र्यांचे फिजीशियन डॉ. एन एस बिष्ट यांनी सांगितले आहे की, रावत यांच्या प्रकृतीत अद्यापही सुधारणा आहे. मात्र दिल्लीत केवळ वैद्यकीय सल्ला म्हणून पाठवले गेले आहे. त्या ठिकाणी त्यांच्या काही तपासण्या केल्या जातील.

१८ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री रावत यांचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. तेव्हापासून ते होम क्वारंटाईनमध्ये होते. विधानसभा सत्रात देखील ते वर्चुअली सहभागी झाले होते. तसेच, इतर कार्यक्रमांना देखील त्यांनी ऑनलाईन हजेरी लावली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 28, 2020 3:12 pm

Web Title: uttarakhand chief minister trivendra singh rawat is being shifted to aiims msr 87
Next Stories
1 देशातील चालकरहित पहिल्या मेट्रोला मोदींनी दाखवला हिरवा झेंडा
2 न्यायालयात हजर राहणे टाळण्यासाठी भाजपा आमदाराने बनवला खोटा करोना अहवाल आणि नंतर..
3 मालकाची विकृती, कॉम्प्रेसरने मजुराच्या गुदद्वारात भरली हवा
Just Now!
X