23 September 2020

News Flash

उत्तराखंडमध्ये ढगफुटी, ३० जणांचा बळी, घरे वाहून गेली

आपत्तीग्रस्त भागामध्ये 'एनडीआरएफ'चे जवान रवाना करण्यात आले आहेत

पिठोरगढ आणि बस्ताडियामध्ये झालेल्या ढगफुटीमुळे अनेक लोक जखमी झाले आहेत. ऋषिकेश ते बद्रिनाथ या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूकही देवप्रयाग येथे दरड कोसळल्याने ठप्प झाली आहे.

उत्तराखंडमधील चामोली, पिठोरगढ, बस्ताडिया जिल्ह्यांत झालेल्या ढगफुटीमुळे आतापर्यंत ३० जणांचा बळी गेला असल्याची माहिती मिळाली आहे. या नैसर्गिक आपत्तीमध्ये अनेक घरे वाहून गेली असून, अनेक लोक बेपत्ता आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. चामोली आणि पिठोरगढ या दोन जिल्ह्यांमध्ये मिळून ३० जणांचा बळी गेला असल्याची माहिती आहे. पुराच्या पाण्यामुळे नंदप्रयाग भागातील पाण्याची पातळी वाढली आहे.
आपत्तीग्रस्त भागामध्ये ‘एनडीआरएफ’चे जवान रवाना करण्यात आले आहेत आणि गरज पडल्यास आणखी जवान पाठविण्यात येतील, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिली. उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरिश रावत यांच्याशी आपले बोलणे झाले आहे. केंद्राकडून त्यांना आवश्यक ती सर्व मदत पुरविण्यात येईल, असे राजनाथ सिंह यांनी ट्विटरवरून सांगितले.
चामोली जिल्ह्यातील घाटामध्ये दोन घरे मंदाकिनी नदीमध्ये वाहून गेली. त्याचबरोबर इतरही घरे धोकादायक स्थितीत आहेत. ती सुद्धा पुराच्या पाण्यात वाहून जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ढगफुटीचा सर्वाधिक फटका चामोली जिल्ह्याला बसल्याचे स्थानिक प्रशासनाने सांगितले. अलकनंदा नदीनेही धोक्याची पातळी ओलांडली आहे.
पिठोरगढ आणि बस्ताडियामध्ये झालेल्या ढगफुटीमुळे अनेक लोक जखमी झाले आहेत. ऋषिकेश ते बद्रिनाथ या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूकही देवप्रयाग येथे दरड कोसळल्याने ठप्प झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 1, 2016 2:36 pm

Web Title: uttarakhand cloudburst kills 30 people
Next Stories
1 VIDEO : ‘तेजस’ची थक्क करणारी भरारी…
2 ‘तेजस’ आज हवाई दलात दाखल, जाणून घ्या १० महत्त्वपूर्ण गोष्टी
3 चौकटीबाहेर जाऊन कामे करा!
Just Now!
X