उत्तराखंडमध्ये खराब हवामानाच्या व्यत्ययामुळे हेलिकॉप्टरव्दारे थांबलेले मदतकार्य हवामानात सुधार झाल्याने पुन्हा सुरू झाले आहे. रुद्रप्रयाग, चामोली, उत्तरकाशी, केदारनाथ आणि बद्रिनाथ पट्ट्यातून आतापर्यंत सत्तर हजार यात्रेकरुंना वाचविण्यात लष्कराला यश आले असून, अजूनही सुमारे २२,००० यात्रेकरु अडकले असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. चाळीस पेक्षा हेलिकॉप्टर्स आणि लष्कराचे सुमारे दहा हजार सैनिक घटनास्थळी यात्रेकरुंना वाचविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत आहेत. उत्तराखंड परिसरात पावसामुळे हेलिकॉप्टरव्दारे सुरू असलेले मदतकार्य थांबले होते. परंतु, तासाभरानंतर हवामानात सुधार आल्याने राहतकार्य पुन्हा सुरू करण्यात आले असल्याचे सुत्रांनी सांगितले आहे.