उत्तराखंडमधील उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती के. एम. जोसेफ यांची आंध्र प्रदेशमधील उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी बदली करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच जोसेफ यांच्याच नेतृत्त्वाखाली खंडपीठाने उत्तराखंडमधील राष्ट्रपती राजवट रद्द करण्याचा निकाल दिला होता. त्याविरोधात केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर या निकालाला स्थगिती देण्यात आली होती.
जोसेफ यांनी जुलै २०१४ मध्ये उत्तराखंड उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदाची जबाबदारी स्वीकारली होती. हैदराबादमधील उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती दिलीप भोसले यांची मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी बदली करण्यात आली आहे.