उत्तराखंडमधील सध्याच्या राजकीय संकटाशी संबंधित याचिकांच्या सुनावणीदरम्यान पक्षातून बडतर्फ करण्यात आलेल्या काँग्रेसच्या आमदारांनी शुक्रवारी मुदत मागितल्यामुळे याचिकांवरील सुनावणी उत्तराखंड उच्च न्यायालयाने १८ एप्रिलपर्यंत पुढे ढकलली. आपले वकील उपलब्ध नसल्याचे कारण सांगून काँग्रेसच्या बंडखोर आमदारांनी सुनावणी पुढे ढकलण्याची विनंती केली होती. ती मान्य करून मुख्य न्यायाधीश के.एम. जोसेफ न्या. व्ही.के. बिस्ट यांच्या खंडपीठाने या प्रकरणाची सुनावणी १८ एप्रिलला निश्चित केली. त्या दिवशी अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी केंद्र सरकारच्यावतीने युक्तिवाद सुरू करणार आहेत.