News Flash

Ayurveda vs Allopathy : आयएमएचं योगगुरू रामदेव बाबांना खुल्या चर्चेचं आव्हान!

योगगुरू रामदेव बाबा यांनी देशात करोनावर उपचार देणाऱ्या डॉक्टरांविषयी केलेल्या वक्तव्यामुळे संतप्त झालेल्या उत्तराखंड आयएमएनं रामदेव बाबांना खुल्या चर्चेचं आव्हान दिलं आहे.

yog guru ramdev baba challenged by ima uttarakhand for open discussion
उत्तराखंड आयएमएचं रामदेव बाबांना आव्हान

करोनावर रुग्णालयांमध्ये होणाऱ्या उपचारांविषयी योगगुरू रामदेव बाबा यांनी केलेल्या विधानांवरून सध्या देशात मोठा वाद निर्माण झाला आहे. इंडियन मेडिकल असोसिएशन अर्थात IMA कडून रामदेव बाबांच्या विधानावर तीव्र आक्षेप घेण्यात आला आहे. या विधानाचा निषेध करण्यासाठी आयएमएनं केंद्र सरकारला पत्र लिहिण्यासोबतच रामदेव बाबा यांच्याविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर एकीकडे आयएमएच्या केंद्रीय मंडळाकडून रामदेव बाबांनी त्यांचं वक्तव्य पूर्णपणे मागे घेण्याची मागणी केली जात असताना आता उत्तराखंड आयएमएनं थेट रामदेव बाबांनाच खुल्या चर्चेचं आव्हान दिलं आहे. रामदेव बाबांनी डॉक्टरांना उद्देशून जवळपास २५ प्रश्नांची यादीच जाहीर केली होती. त्यानंतर आता उत्तराखंड आयएमएकडून हे आव्हान देण्यात आलं आहे.

 

व्हायरल व्हिडीओमध्ये रामदेव बाबा म्हणाले…

काही दिवसांपूर्वी रामदेव बाबांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यामध्ये त्यांनी करोनाच्या दोन्ही लसी घेतल्यानंतर देखील एक हजार डॉक्टर मेल्याचा दावा केला होता. “जे स्वत:ला वाचवू शकत नाहीत, ते कसले डॉक्टर?” असा सवाल देखील ते विचारताना दिसले.

 

“त्यांचा बापही अटक करू शकत नाही”

या व्हिडिओनंतर मोठ्या प्रमाणावर रामदेव बाबांवर टीका होऊ लागल्यानंतर त्यांचा अजून एक व्हिडिओ व्हायरल झाला. यामध्ये, “लोक कधीकधी रामदेवबाबा यांना अटक करण्याचा ट्रेंड सोशल मीडियावर चालवतात तर कधी रामदेवबाबा ठग असल्याचे ट्रेंड चालवतात. चालू द्या, पण आता आपण हे गुण देखील शिकलो आहोत आणि आम्ही जे लोकं जो ट्रेंड चालवितो तो देखील शीर्षस्थानी असतो. अटक तर त्यांचा बाप सुद्धा करू शकत नाही”, असं म्हणताना दिसले.

 

देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

या सगळ्या प्रकारामुळे संतप्त झालेल्या डॉक्टरांच्या शीर्ष संघटना आयएमएनं रामदेव बाबांना १ हजार कोटींची नोटीस पाठवली. तसेच, आपल्या विधानाबद्दल माफी देखील मागण्यास सांगितलं. इतक्यावरच न थांबता, आयएमएनं योगगुरू रामदेवबाबा यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची देखील मागणी करणारं पत्र थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलं आहे.

“आमचं त्यांच्याशी वाकडं नाही”

दरम्यान, रामदेव बाबांविरोधात दाखल केलेल्या तक्रारीविषयी बोलताना आयएमएचे केंद्रीय अध्यक्ष डॉ. जी. ए. जयलाल यांनी सांगितलं, “आमचं रामदेव बाबांशी काही वाकडं नाही. जर रामदेव बाबा त्यांचं विधान पूर्णपण माघारी घेणार असतील, तर आम्ही आमची तक्रार मागे घेऊ. आम्हाला वाटतं की त्यांची वक्तव्य लोकांमध्ये संभ्रम निर्माण करू शकतात. त्यांचे खूप सारे अनुयायी असल्यामुळे आम्हाला ही भिती वाटते.”

हा माझा नाही, सरकारच्या धोरणांचा दोष; ‘कोरोनील’वर बाबा रामदेव यांनी दिलं उत्तर

या सर्व पार्श्वभूमीवर आता उत्तराखंड आयएमएनं रामदेव बाबांना खुल्या चर्चेचं आव्हान दिल्यामुळे त्यांच्याडून काय पाऊल उचललं जाणार, हे महत्त्वाचं ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 29, 2021 1:03 pm

Web Title: uttarakhand ima challenge yog guru ramdev baba statement on doctors corona treatment pmw 88
टॅग : Corona,Coronavirus,Doctor
Next Stories
1 दिल्लीहून उड्डाण घेतलेल्या विमानात आढळले वटवाघूळ, विमान माघारी
2 देशात गेल्या २४ तासात आढळले १.७३ लाख करोना रुग्ण, ३,६१७ जणांचा मृत्यू
3 ‘करोना काळात भारताने केलेली मदत कधीही विसरता येणार नाही’; अमेरिकेनं व्यक्त केली कृतज्ञता
Just Now!
X