21 September 2020

News Flash

आता हेलिकॉप्टर दुर्घटनेतील शहीद जवानांची ओळख पटवण्याचे आव्हान

उत्तराखंडमधील बचावकार्यादरम्यान कोसळलेल्या हवाई दलाच्या हेलिकॉप्टरमधील २० मृतदेहांपैकी १७ जळाले असल्याने त्यांची ओळख कशी पटवायची असा प्रश्न आता उपस्थित झालाय.

| June 27, 2013 11:58 am

उत्तराखंडमधील बचावकार्यादरम्यान कोसळलेल्या हवाई दलाच्या हेलिकॉप्टरमधील २० मृतदेहांपैकी १७ जळाले असल्याने त्यांची ओळख कशी पटवायची असा प्रश्न आता उपस्थित झालाय. या मृतदेहांना त्यांच्या कुटुंबीयांकडे सोपविण्यापू्र्वी त्यांची ओळख पटविणे आवश्यक आहे. मात्र, जळाल्यामुळे मृतदेह ओळखणे खूपच अवघड झाले आहे. त्याचबरोबर हेलिकॉप्टर कोसळल्यामुळे शहीद झालेल्या सैनिकांचे डीएनए सॅम्पल्स लष्कराकडे नसल्यामुळे हा प्रश्न अधिकच जटील बनला आहे.
खराब हवामानामुळे हवाई दलाने अजून सर्व मृतहेद हेलिकॉप्टर कोसळल्याच्या ठिकाणावरून ताब्यात घेतलेले नाहीत. हवामानात सुधारणा झाल्यानंतरच हे मृतदेह छोट्या हेलिकॉप्टरमधून एक एक करून गुप्तकाशीला आणण्यात येतील. २० पैकी १७ मृतदेह मिळाले असले, तरी अन्य तीन मृतदेहांचा शोध अद्याप लागलेला नाही.
केदारनाथमधील बचावकार्यासाठी आठवडाभरापासून तिथे असलेले जवान या हेलिकॉप्टरमधून परतत होते. १५ ते २० मिनिटांत त्यांनी गौचरला पोहोचणे अपेक्षित होते. बचावकार्य संपवून परतत असल्यामुळे हे जवान आनंदित असतील. त्याचवेळी त्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला, अशी माहिती इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलिसांचे महासंचालक अजय चढ्ढा यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 27, 2013 11:58 am

Web Title: uttarakhand no dna samples chopper crash victims hard to identify
Next Stories
1 पूरपीडिताच्या खांद्यावर बसून वार्तांकन करणाऱया वार्ताहराची हकालपट्टी
2 उत्तराखंडमध्ये साथीचे रोग नाहीत : केंद्राचा दावा
3 पंचायत निवडणूकांसाठी केंद्रीय फौजा नको
Just Now!
X