News Flash

उत्तराखंड पोलिसांच्या हाती संशयास्पद हालचालींचे सीसीटीव्ही चित्रण; हाय अलर्ट जारी

पोलिसांच्या हाती लागलेल्या सीसीटीव्ही चित्रणात सात ते आठ व्यक्ती एकत्र घोळका करून उभ्या आहे

काही व्यक्तींच्या संशयास्पद हालचाली असलेले सीसीटीव्ही चित्रण हाती लागल्यानंतर उत्तराखंड पोलिसांकडून हाय अलर्ट जारी करण्यात आहे. पोलिसांच्या हाती लागलेल्या सीसीटीव्ही चित्रणात सात ते आठ व्यक्ती एकत्र घोळका करून उभ्या आहे. गेल्या काही दिवसांतील दहशतवादी कारवायांच्या पार्श्वभूमीवर या व्यक्तींच्या हालचाली संशयास्पद दिसून आल्या आहेत. दरम्यान, या सगळ्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून सीसीटीव्ही चित्रणाची ही क्लिप व्हॉटस अॅपवर प्रदर्शित करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच हरिद्वार येथील रूरकी येथून आयसिसशी संबंध असलेल्या चौघाजणांना ताब्यात घेण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर हे सीसीटीव्ही चित्रण अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2016 3:36 pm

Web Title: uttarakhand police sounds alert after cctv grab shows terror suspect with eight others
टॅग : Cctv,Isis,Terror Attack
Next Stories
1 चंदीगडमधील रस्त्यावर काळविटाचा धुमाकूळ
2 राजपथावरील प्रजासत्ताक दिनाचा सोहळा संपन्न
3 असहिष्णुतेपासून देशाचे रक्षण आवश्यक
Just Now!
X