18 September 2020

News Flash

प्रलयामुळे उत्तराखंडाला १२००० कोटींचा फटका?

उत्तराखंडातील केदारनाथ येथे या महिन्यात आलेल्या प्रलयामुळे केवळ जीवितहानीच नाही तर मोठा आर्थिक फटकाही बसला आहे. या प्रलयामुळे उत्तराखंडाच्या पर्यटन विभागाला तब्बल १२ हजार कोटी

| June 27, 2013 02:29 am

उत्तराखंडातील केदारनाथ येथे या महिन्यात आलेल्या प्रलयामुळे केवळ जीवितहानीच नाही तर मोठा आर्थिक फटकाही बसला आहे. या प्रलयामुळे उत्तराखंडाच्या पर्यटन विभागाला तब्बल १२ हजार कोटी रुपयांचा फटका बसण्याची भीती येथील अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. उत्तराखंडाला चालू आर्थिक वर्षांत पर्यटनापोटी २५ हजार कोटी रुपयांचे उत्पन्न होईल, असा अंदाज सुरुवातीला व्यक्त करण्यात आला होता. पहिल्या तिमाहीत पर्यटनाच्या माध्यमातून पाच ते सहा हजार कोटी रुपयांचे उत्पन्न झालेही, मात्र या प्रलयात राज्यातील बहुतांश पर्यटनस्थळांची दुरवस्था झाल्याने उर्वरित वर्षांत तेथे पर्यटक फिरकण्याची शक्यता दिसत नाही. परिणामी, उत्तराखंडाला किमान १२ हजार कोटींचा फटका बसण्याची भीती या तज्ज्ञांनी वर्तविली आहे. उत्तराखंडाच्या एकूण उत्पन्नात पर्यटनातील उत्पन्नाचा २५ ते ३० टक्के वाटा असल्याने राज्याच्या अर्थव्यवस्थेवरही याचा विपरीत परिणाम होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 27, 2013 2:29 am

Web Title: uttarakhand tourism industry will suffer rs 12000 crore loss
Next Stories
1 राहुल गांधी यांच्या दौऱ्यानंतर केंद्रीय गृहमंत्र्यांचे घूमजाव
2 स्नोडेन मॉस्को विमानतळावरच
3 बेनीप्रसाद वर्मा यांच्या आरोपांमुळे काँग्रेसची पंचाईत
Just Now!
X