सोमवारी दि. १५ मार्चला एकाच दिवशी ३० लाख लोकांना कोविड प्रतिबंधक लस देण्यात आली असून आतापर्यंत एका दिवसात एवढ्या मोठ्या संख्येने प्रथमच लस देण्यात आली आहे. एकूण ३ कोटी ३९ लाख ४७ हजार ४३२ लोकांना लस देण्यात आली असल्याचे आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी म्हटले आहे.

साठीच्या वरील सुमारे १ कोटी लोकांना १५ दिवसांत लस देण्यात आली असून १५ मार्चला २४ तासात ३० लाख ३९ हजार ३९४ जणांना लस देण्यात आली. त्यासाठी ५९ लसीकरण सत्रे घेण्यात आली. २६ लाख २७ हजार ९९ लोकांना पहिली मात्रा देण्यात आली असून त्यासाठी ४२९१९ सत्रे घेण्यात आली. ४ लाख १२ हजार २९५ व्यक्तींना दुसरी मात्रा देण्यात आली आहे.

२६ लाख २७ हजार ०९९ लाभार्थींमध्ये १९ लाख ७७ हजार १७४ लाभार्थी हे वयाच्या साठीवरील आहेत. ४ लाख २४ हजार ७१३ व्यक्ती या ४५-६०या वयोगटातील आहेत. आतापर्यंत ३,२९,४७,४३२ लशीचे डोस  ५ लाख ५५ हजार ९८४ सत्रांमधून देण्यात आले.

७४ लाख ४६ हजार ९८३ आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिली मात्रा देण्यात आली आहे. ४४ लाख ५८ हजार ६१६ आरोग्य  कर्मचाऱ्यांना दुसरी मात्रा देण्यात आली आहे.  ७४ लाख ७४ हजार ४०६ आघाडीच्या कर्मचाऱ्यांना पहिली तर १४ लाख ९ हजार ३३२ लोकांना दुसरी मात्रा देण्यात आली आहे. १८ लाख ८८ हजार ७२७ इतक्या ४५ वयोगटावरील व्यक्तींना लस देण्यात आली आहे. साठीवरील १ ०२६९३६८ व्यक्तींना पहिली मात्रा देण्यात आली आहे.

, पंजाब, कर्नाटक, गुजरात, तामिळनाडू या राज्यांमध्ये कोविड रुग्णांची संख्या वाढत असून ७९.७३ टक्के इतका सकारात्मकता दर २४ तासात दिसून आला.

गुजरात : शहरांमधील संचारबंदीच्या कालावधीत वाढ

अहमदाबाद : करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी गुजरात सरकारने मंगळवारी चार मोठ्या शहरांमधील संचारबंदीच्या कालावधीत आणखी दोन तासांनी वाढ केली आहे. हे निर्बंध ३१ मार्चपर्यंत लागू राहणार आहेत.

आता अहमदाबाद, सुरत, वडोदरा आणि राजकोटमध्ये रात्री १० वाजल्यापासून सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी जारी करण्यात आली आहे. यापूर्वी रात्री १२ वाजल्यापासून सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी जारी करण्यात आली होती.

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी यांच्या अध्यक्षतेखालील करोना कृती-दलाच्या मध्यवर्ती समितीची बैठक मंगळवारी झाली त्यामध्ये संचारबंदीच्या कालावधीत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला, असे सरकारच्या वतीने सांगण्यात आले.