17 January 2021

News Flash

उद्यापासून लसीकरण

पंतप्रधानांच्या हस्ते मोहिमेचे उद्घाटन

 

देशात बहुप्रतीक्षित करोना प्रतिबंधक लसीकरण उद्या, शनिवारपासून सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मोहिमेचे उद्घाटन करण्यात येणार असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी जाहीर केले.

करोनायोद्धय़ांना सर्वात आधी लशीचा लाभ मिळणार असून, त्यापैकी काही जणांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी दूरचित्रसंवाद यंत्रणेद्वारे संवादही साधणार आहेत. लसीकरण मोहिमेच्या प्रारंभावेळी लशींचा पुरवठा आणि वितरणावर देखरेख ठेवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ‘को-विन’ अ‍ॅपचे लोकार्पणही पंतप्रधानांच्या हस्ते होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

देशातील एकूण २९३४ लसीकरण केंद्रांपैकी काही ठरावीक केंद्रांतील लाभार्थ्यांना पंतप्रधानांशी संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. त्यासाठी या केंद्रावरील अधिकाऱ्यांना तंत्रज्ञानविषयक आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यास सांगण्यात आले आहे. दिल्लीतील एम्स आणि सफदरजंग रुग्णालयांचा या केंद्रांमध्ये समावेश आहे.

आरोग्य क्षेत्रातील जवळपास तीन कोटी कर्मचाऱ्यांना २९३४ केंद्रांवर लस टोचण्यात येणार आहे. एका केंद्रावर दररोज एका सत्रात १०० जणांचे लसीकरण करण्याची सूचना राज्यांना देण्यात आली आहे. लसीकरणादरम्यान काही मात्रा वाया जाण्याची शक्यता गृहीत धरून प्रति १०० कुप्यांमागे दहा कुप्या राखीव ठेवण्यात येणार आहेत.

देशात शनिवारपासून सुरू होणारी ही जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम असेल. त्यामुळे आरोग्य मंत्रालयाने राष्ट्रपतींच्या कार्यालयाशी सल्लामसलत करून पोलिओ लसीकरणाच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला असून, पोलिओ लसीकरण ३१ जानेवारीला असेल, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

लसीकरण असे..

* पहिल्या टप्प्यात तीन कोटी करोनायोद्धय़ांचे लसीकरण करण्यात येईल. त्यानंतर पन्नाशीवरील व्यक्ती आणि सहव्याधी असलेल्या व्यक्ती लशीच्या लाभार्थी ठरतील.

* पहिल्या टप्प्यातील करोनायोद्धांच्या लसीकरणाचा खर्च केंद्र सरकार उचलणार आहे.

* मात्र, सामान्यांच्या लशींच्या खर्चाच्या मुद्दय़ावर सरकारकडून अद्यापही स्पष्टता नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2021 12:38 am

Web Title: vaccination from tomorrow abn 97
टॅग Coronavirus
Next Stories
1 तज्ज्ञ समितीतून मान यांची माघार
2 करोना उगमाच्या तपासासाठी ‘डब्ल्यूएचओ’ पथक वुहानमध्ये
3 शेतकऱ्यांच्या विनाशाचे कारस्थान
Just Now!
X