News Flash

देशात लसीकरणाचा आकडा ३० कोटींच्या पुढे; केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती

भारतात २४,८२,२४,९२५ नागरिकांना करोना लसीचा पहिला डोस तर ५,३४,०१,१०३ नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. 

भारतात लसीकरण मोठ्या प्रमाणात सुरु

करोनाने संपुर्ण जगात हाहाकार केला आहे. करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण महत्वाचे असल्याचे तज्ञांनी सांगितले आहे. आता भारतात देखील लसीकरण मोठ्या प्रमाणात सुरु आहे. भारतात आतापर्यंत ३० करोडपेक्षा अधिक करोना डोस देण्यात आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार भारतात एकूण ३०,१६,२६,०२८ लस डोस देण्यात आले आहेत, ज्यात पहिल्या आणि दुसर्‍या डोसचा समावेश आहे. त्याचबरोबर, गेल्या २४ तासांत ६४,८९,५९९ लस डोस देण्यात आले आहेत.

आतापर्यंत देण्यात आलेल्या ३०,१६,२६,०२८ डोस मध्ये २४,८२,२४,९२५ नागरिकांना करोना लसीचा पहिला डोस तर ५,३४,०१,१०३ नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे.

७१ लाख हेल्थकेअर कर्मचार्‍यांना देण्यात आले दोन्ही डोस 

भारतात आतापर्यंत ७१ लाख हेल्थकेअर कर्मचाऱ्यांना करोना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. यामध्ये १,०१,५८,९१५ कर्मचाऱ्यांना पहिला तर ७१,३२,८८८ जणांना दुसरा डोस देण्यात आला. तसेच तर १,७३,०३,६५८ फ्रंटलाइन कामगारांना प्रथम डोस आणि ९१,८५,१०६ जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. २१ जूनपासून लागू करण्यात आलेल्या नवीन मार्गदर्शक सूचनांनंतर गेल्या तीन दिवसांत २ कोटींपेक्षा जास्त लसींचे डोस देण्यात आले आहेत. तीन दिवसांत २,०७,२१,५६३ डोस देण्यात आले आहेत.

देशात गेल्या २४ तासांत ५४,०६९ नवे रुग्ण

करोनाची दुसरी लाट मंदावली असतानादेखील संक्रमणाचा कहर अजूनही थांबलेला नाही. देशात पुन्हा ५०  हजाराहून अधिक नवीन करोनाबाधितांची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासात ५४ हजार ६९ नविन बाधितांची नोंद झाली आहे. तर १,१३२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी देशात ५० हजार ८४८ करोना बाधित आढळले होते. दरम्यान, ६६ हजार ८८५ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. त्यामुळे मागील २४ तासात १६ हजार १३७ रुग्णांमध्ये घट झाली आहे.

हेही वाचा- डेल्टा प्लस व्हायरसमुळे देशात करोनाची तिसरी लाट येणार?; महाराष्ट्राला कितपत धोका?

आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात सलग ४२ व्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्याचबरोबर आतापर्यंत ३९ कोटी ७८ लाखाहून अधिक करोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. बुधवारी सुमारे १९ लाख करोना नमुना चाचण्या घेण्यात आल्या, ज्यांचा पॉझिटिव्हिटी दर ३ टक्क्यांपेक्षा जास्त आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 24, 2021 3:25 pm

Web Title: vaccination numbers in the country exceed 30 crore information from the union ministry of health srk 94
टॅग : Corona,Coronavirus
Next Stories
1 बहिणीच्या नवऱ्यासोबत गेली होती पळून; अल्पवयीन मुलीला दीड लाखांना विकले
2 तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर मुलांच्या सुरक्षेसाठी योग्य पावले उचला; लसीकरणाच्या वेगाबाबत सोनिया गांधीनी व्यक्त केली चिंता
3 “३१ जुलैपर्यंत बोर्डाचे निकाल जाहीर करा”, सर्वोच्च न्यायालयाचे सर्व राज्यांना आदेश!
Just Now!
X