24 February 2021

News Flash

केवळ लशीमुळे करोनावर मात करणे शक्य नाही; WHO च्या प्रमुखांचा खळबळजनक दावा

जगाचं लक्ष लशीकडे लागलेलं असताना या विधानामुळं संभ्रम निर्माण होऊ शकतो.

संग्रहीत छायाचित्र

लस स्वतः करोना विषाणूचा संसर्ग रोखू शकत नाही, असं खळबळजनक विधान जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक ट्रेडोस अधनोम घेब्रेसस यांनी केलं आहे. गेल्या काही महिन्यांत जगभरात करोनाच्या संसर्गाचे प्रमाण वाढले असून या विषाणूने ५४ दशलक्ष लोकांना संक्रमित केले आहे. तर सुमारे १.३ दशलक्ष लोकांचा यामुळे मृत्यू झाला आहे.

टेड्रोस म्हणाले, “करोनाशी लढण्यासाठी इतर साधनांसोबत कोणतीही लस ही एक पूरक साधन म्हणून काम करेल. मात्र, त्यांची जागा घेऊ शकणार नाही. केवळ लस ही स्वतः ही महामारी संपवू शकत नाही. विषाणूचे अस्तित्व येत्या काळातही कायम राहणार आहे. त्यामुळे लोकांच्या चाचण्या होणं, त्यांना क्वारंटाइन करणं, ट्रेसिंग आणि फिजिकल डिस्टंसिंग पाळणं आवश्यक असणार आहे.”

जागतिक आरोग्य संघटनेच्या शनिवारी जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, ६,६०,९०५ करोनाची प्रकरणांची संयुक्त राष्ट्रांच्या आरोग्य एजन्सीकडे नोंद झाली आहे. हा एक नवा विक्रमच आहे. हा आकडा आणि शुक्रवारी नोंद झालेल्या ६,४५,४१० या आकडेवारीनं ७ नोव्हेंबर रोजी नोंद झालेल्या एका दिवसाची ६,१४,०१३ आकडेवारी पार केली आहे.

टेड्रोस म्हणाले, “सुरुवातीला करोनावरील लस पुरवठा हा मर्यादित असेल. त्यामुळे ही लस आरोग्य कर्मचारी, वृद्ध लोक आणि इतर जोखीम असणार्‍या लोकांना प्राधान्य दिले जाईल. यामुळे मृत्यूची संख्या कमी होईल आणि आरोग्य यंत्रणेला करोनाशी लढण्यास मदत होईल”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 16, 2020 9:10 pm

Web Title: vaccine alone will not be enough to stop covid 19 pandemic says who chief aau 85
टॅग Coronavirus
Next Stories
1 करोनावरील लस ९४ टक्के प्रभावी; अमेरिकेतील मॉडर्ना कंपनीचा दावा
2 सुशीलकुमार मोदींना उपमुख्यमंत्री न बनवल्याबद्दल नितीश कुमार म्हणाले…
3 तेजस्वी यादव यांनी नितीश कुमारांना दिल्या शुभेच्छा, म्हणाले…
Just Now!
X