News Flash

‘लस दरावरील मर्यादा हा कंपन्यांचा विश्वासघात’

किरण शॉ मुजुमदार यांचे वक्तव्य

(संग्रहित छायाचित्र)

 

करोना प्रतिबंधक लशीच्या किमतीला खासगी रुग्णालयांना २५० रुपयांची मर्यादा घालून दिल्याप्रकरणी बायोकॉन उद्योगसमूहाच्या अध्यक्षा किरण शॉ मुजुमदार यांनी सरकारवर टीका केली असून, इतकी कमी किंमत औषध कंपन्यांना परवडणारी नसून हा विश्वासघात असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

आरोग्य मंत्रालयाने खासगी रुग्णालये व आरोग्य केंद्रांना लशीची किंमत एका मात्रेला २५० रुपये ठरवून दिली आहे. त्यावर ट्विट संदेशात मुजुमदार यांनी म्हटले आहे, की यामुळे लस उद्योगाला प्रोत्साहन मिळणार नसून उलट त्यांचे नुकसान होणार आहे.  खासगी रुग्णालयांना ही मर्यादा घालून दिल्याने लस कंपन्यांना टिकून राहणे कठीण जाणार आहे. मुजुमदार शॉ यांनी असा प्रश्न केला,की जागतिक आरोग्य संघटनेने एका मात्रेची किंमत ३ डॉलर ठरवून दिली असताना आपण ती २ डॉलर्स ठेवली आहे.

सरकारने खासगी रुग्णालयांना लशीच्या किमतीवर मर्यादा घालून दिली आहे. साठ वर्षांवरील व्यक्ती व ४५ वर्षांंवरील सहआजाराच्या व्यक्ती यांना लस देण्याची मोहीम सुरू करण्यात आली असताना लशीची किंमत कमी ठेवण्यात आली आहे. कोविड १९ लस सरकारी रुग्णालयात मोफत दिली जाणार आहे, तर खासगी रुग्णालयात एका मात्रेला २५० रुपये व दोन मात्रांना ५०० रुपये मोजावे लागणार आहेत. या अडीचशे रुपयात शंभर रुपये सेवा शुल्क आहे.

‘जॉन्सन’च्या लशीला अमेरिकेत परवानगी

वॉशिंग्टन : आपत्कालीन वापरासाठी दोनऐवजी केवळ एक मात्रा द्याव्या लागणाऱ्या जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीच्या कोविड-१९ वरील लशीच्या अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) परवानगी दिली आहे. यामुळे ५ लाखांहून अधिक करोनाबळी गेलेल्या अमेरिकेत करोना महासाथीशी लढण्यासाठी अमेरिकेत तिसरी लस उपलब्ध झाली आहे.

अध्यक्ष जो बायडेन यांनी कोविड-१९ संकट संपवण्याच्या प्रयत्नात एफडीएच्या मंजुरीचे वर्णन ‘उत्साहवर्धक घडामोड’ असे केले असून, ही सर्व अमेरिकी नागरिकांसाठी रोमांचक बातमी असल्याचे म्हटले आहे.

दोनऐवजी एकच मात्रा पुरेशी असलेल्या जॉन्सन अँड जॉन्सनच्या लशीला शनिवारी मंजुरी मिळाली. यापूर्वी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये दोन मात्रांच्या फायझर व मॉडर्ना कंपनीच्या लशींना आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्यात आली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 1, 2021 12:34 am

Web Title: vaccine price hike is a betrayal of companies abn 97
Next Stories
1 देशात महिनाभरातील उच्चांकी रुग्णवाढ
2 ‘पेट्रोलियम उत्पादने जीएसटीमध्ये असावीत’
3 येत्या दोन वर्षांत आणखी १ कोटी मोफत गॅसजोडण्या
Just Now!
X