भारतात सीरम आणि ऑक्सफोर्डने तयार केलेल्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेक कंपनीने तयार केलेल्या कोव्हॅक्सिन या दोन्ही लसींना आपात्कालीन वापरासाठी संमती देण्यात आली आहे. डीसीजीआयने पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली आहे. तसेच, दोन्ही लसी ११० टक्के सुरक्षित असल्याचं डीसीजीआयचे संचालक व्ही.जी.सोमाणी यांनी सांगितलं आहे.

“तुम्ही एका गोष्टीची खात्री बाळगा की कशातही सुरक्षिततेची शंका असेल, जराही शंका असेल तर आम्ही त्याला कधीच मान्यता देणार नाही. लसी ११० टक्के सुरक्षित आहेत. थोडेफार दुष्परिणाम असतातच जसे की दंडावर दुखणं, थोडासा ताप येणं, थोडीशी अॅलर्जी होणं हे तर प्रत्येक लसीसाठी सामान्य आहे.” असं माध्यमांशी बोलताना व्ही जी सोमाणी यांनी सांगितलं आहे.

दरम्यान करोनाची लस घेतल्यामुळे नपुंसकत्व येतं असा आरोप समाजवादी पक्षाचे नेते आशुतोष सिन्हा यांनी केला आहे. याबाबत डीसीजीआयचे व्ही. जी. सोमानी यांना विचारलं असता, “असं म्हणणं साफ चुकीचं आहे ” असं सोमानी यांनी स्पष्ट केलं.

मोठी बातमी! कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसींना तातडीच्या वापराची संमती

तर, . कोविशिल्ड लसीला ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडून (केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्था) मंजुरी देण्यात आल्यानंतर सीरम इन्सिस्ट्यूटचे अदर पुनावाला यांनी ट्विट करून आनंद व्यक्त केला आहे.