21 January 2021

News Flash

मोठी बातमी! कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसींना तातडीच्या वापराची संमती

लसीकरणाच्या मोहिमेसाठी केंद्र सरकारचं महत्त्वाचं पाऊल

भारतात कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लसींना आपात्कालीन वापराची संमती देण्यात आली आहे. त्यामुळे लसीकरणाच्या प्रक्रियेतला सर्वात मोठा टप्पा पार पडला आहे. सीरम आणि ऑक्सफोर्डने तयार केलेल्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेक कंपनीने तयार केलेल्या कोव्हॅक्सिन या दोन्ही लसींना आपात्कालीन वापरासाठी संमती देण्यात आली आहे. डीसीजीआयने पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली आहे. भारतात करोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणावर झाला. त्यानंतर चर्चा सुरु झाली ती लसीकरणाच्या मोहिमेची. कालच ड्राय रनही पार पडला. आता प्रतीक्षा होती ती आपात्कालीन वापरासाठी दोन्ही लसींना संमती मिळते की नाही याची.. दरम्यान दोन्ही लसींना संमती देण्यात आली आहे. लसीकरणाच्या मोहिमेतलं हे एक महत्त्वाचं पाऊल आहे.

या दोन्ही व्हॅक्सिन अर्थात लसी पूर्णपणे सुरक्षित आहेत असं डीसीजीआयने म्हटलं आहे. सीरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी यापूर्वीच लसीचे पाच कोटी डोस तयार असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात अडीच कोटी लोकांना लस दिली जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान करोनाची लस घेतल्यामुळे नपुंसकत्व येतं असा आरोप समाजवादी पक्षाचे नेते आशुतोष सिन्हा यांनी केला आहे. याबाबत डीसीजीआयचे व्ही. जी. सोमानी यांना विचारलं असता, ”आम्ही कधीही अशा लसीला संमती देणार नाही जी नपुंसकत्व आणते. या दोन्ही लसी १०० टक्के सुरक्षित आहेत. लस घेतल्याने पुरुषांना नपुंसकत्व येतं असं म्हणणं साफ चुकीचं आहे. अशा मूर्खपणाच्या वक्तव्यांकडे लक्ष देऊ नये.” असं सोमानी यांनी स्पष्ट केलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 3, 2021 11:15 am

Web Title: vaccines of serum institue of india and bharat biotech are granted permission for restricted use in emergency situation says dcgi scj 81
Next Stories
1 Coronavirus – देशात मागील २४ तासांत २० हजार ९२३ जण करोनामुक्त, २१७ रुग्णांचा मृत्यू
2 कोविड-19 वॅक्सीनमुळे तुम्ही नपुंसकही होऊ शकता, काहीपण होऊ शकतं – आशुतोष सिन्हा
3 असा काही त्रास असेल, याची कल्पनाही करू शकत नाही- ममता बॅनर्जी
Just Now!
X