News Flash

.. आणि रॉबर्ट वढेरा पत्रकारांवर भडकले

कॉँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वढेरा हे शनिवारी पत्रकारांवर भडकले.

| November 2, 2014 10:32 am

कॉँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वढेरा हे शनिवारी पत्रकारांवर भडकले.  दिल्लीतील अशोक हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमादरम्यान हा सर्व प्रकार घडला. न्यूज एजन्सी ‘एएनआय’च्या वार्ताहराने जमिनीच्या व्यवहाराबाबत प्रश्न विचारल्यानंतर वढेरा यांना राग अनावर झाला. जमीन गैरव्यवहाराबाबत विचारले असता, वद्रा यांनी रागाने, “आर यू सिरीयस?‘ असे म्हणत पत्रकाराचा कॅमेरा ढकलून दिला. त्यानंतर वद्रा यांनी त्या पत्रकाराला कॅमेरा बंद करायला सांगत त्याच्या प्रश्‍नाला उत्तर देण्यास बांधील नसल्याचे सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 2, 2014 10:32 am

Web Title: vadra pushes away microphone angrily when reporter asks him about haryana land deal
Next Stories
1 नरेंद्र मोदी हे तर देवाचा अवतार!
2 वाहन खरेदीचे ‘दिवाळे’
3 विद्यमान शिक्षण पद्धती बदलणे गरजेचे -गृहमंत्री
Just Now!
X