07 March 2021

News Flash

डोनाल्ड ट्रम्प यांची सुन आणि मुलगा विभक्त होणार, वेनेसा ट्रम्पचा घटस्फोटासाठी अर्ज

दोघांच्या नात्यात वितुष्ट आले असल्याची माहिती समोर

संग्रहित छायाचित्र

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कुटुंबातील कलहाची बातमी समोर आली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचा मुलगा डोनाल्ड ट्रम्प ज्युनिअर आणि त्याची पत्नी वेनेसा ट्रम्प या दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. वेनेसाने मॅनहॅटन सर्वोच्च न्यायालयात घटस्फोटासाठीचा अर्ज दाखल केला आहे. डोनाल्ड ट्रम्प ज्युनिअर आणि वेनेसा यांचे १३ वर्षांचे नाते या घटस्फोटामुळे संपुष्टात येणार आहे. या दोघांमधले नाते संपुष्टात येण्याची काही कारणे अनाकलनीय आहेत. ज्यापैकी एक कारण हे डोनाल्ड ट्रम्प ज्युनिअर यांनी केलेल्या ट्विट्सचेही आहे. ट्रम्प ऑर्गनायझेशनच्या स्थापनेपासूनच मी आनंदी नाही असे वेनेसाने आपल्या घटस्फोटासाठी दाखल केलेल्या अर्जात म्हटले आहे.

डोनाल्ड ट्रम्प ज्युनिअर आणि वेनेसा यांचे लग्न २००५ मध्ये झाले होते. एका फॅशन शोमध्ये या दोघांचे नाते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समोर आणले होते. या दोघांचे लग्न जमवण्यात डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा वाटा होता. डोनाल्ड ट्रम्प ज्युनिअर सोबत लग्न झाल्यानंतर वेनेसाने ट्रम्प ऑर्गनायझेशनमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला नव्हता. ‘पेज सिक्स डॉटकॉम’ने या दोघांमध्ये काहीही आलबेल नाही आणि त्यांचा घटस्फोट होणार हे वृत्त सर्वात आधी दिले होते.

वेनेसा आणि डोनाल्ड ट्रम्प ज्युनिअर या दोघांना ५ मुले आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून या दोघांमधून विस्तव जात नव्हता त्यामुळेच या दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे. कायदेशीर रित्या हे दोघे वेगळे झाले नव्हते तेव्हाही हे दोघे वेगळे असल्याप्रमाणेच राहात होते असेही पेज सिक्स डॉट कॉमने म्हटले आहे. या दोघांमध्ये खटके उडत होते. डोनाल्ड ट्रम्प यांनी या दोघांचे वाद मिटवण्यासाठी खूपवेळा प्रयत्न केला मात्र या दोघांमधले वाद संपले नाहीत. त्यामुळे या दोघांमध्ये आता घटस्फोट होतो आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांची अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झाल्यापासूनच ट्रम्प कुटुंबातील सदस्यांकडे सगळ्या जगाचे लक्ष आहे. ही बाब वेनेसाला मुळीच पटली नव्हती. तसेच तिला तिच्या मुलांबाबतही सारखी काळजी लागून राहिलेली असे. डोनाल्ड ट्रम्प ज्युनिअरने हल्ली वेनेसाला वेळ देणे बंद केले होते. मागील वर्षी डोनाल्ड ट्रम्प ज्युनिअर काही काळासाठी घर सोडून अज्ञात स्थळी राहिला होता. तसेच तो मुलांकडेही लक्ष देत नव्हता. या सगळ्या कारणांमुळे वेनेसा वैतागली होती त्याचमुळे या दोघांचे नाते संपुष्टात येणार असे संकेत मिळत होते. वेनेसाने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केल्याने या दोघांचे १३ वर्षांचे वैवाहिक नाते संपुष्टात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 16, 2018 5:04 am

Web Title: vanessa trump files for divorce from donald trump jr after 13 years of marriage
Next Stories
1 आयआयटीच्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या
2 फ्लोरिडातला पादचारी पूल कोसळला, ४ ठार तर ९ जखमी
3 जीएसटी सर्वात किचकट आणि महाग
Just Now!
X