सिगारेट आरोग्यासाठी हानीकारक आहे अशी सूचना लिहिलेली असूनही लोक सिगारेटचे व्यसन करताना दिसतात. हे व्यसन सुटावे म्हणून इ सिगारेटचा पर्याय निघाला आहे. मात्र त्यातही निकोटीन असलेली सिगारेट मिळते. इ सिगारेटचा वापर करुन सिगारेट ओढण्याचा फिल अनेकजण घेतात. मात्र फ्लोरिडातील एका टीव्ही प्रोड्युसरला ही इ सिगारेट ओढणे चांगलेच महागात पडले आहे. इ सिगारेट ओढण्याची सवय असलेल्या या टीव्ही प्रोड्युसरचा मृत्यू या सिगारेटच्या स्फोटात झाला आहे. टलमाडगे वेकमन डी एलिया असे टीव्ही प्रोड्युसरचे नाव आहे. त्याच्याकडे असलेल्या इ सिगारेटचा स्फोट झाला. त्यात तो ८० टक्के भाजला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.

टलमाडगे वेकमन डी एलियाच्या मृतदेहाची ऑटप्सी करण्यात आली. त्यानंतर ही बाब निश्चित झाली की इ सिगारेटच्या स्फोटात भाजल्यामुळेच त्याचा मृत्यू झाला. टलमाडगे वेकमन डी एलिया हा फ्लोरिडातील टीव्ही प्रोड्युसर आहे. इ सिगारेटच्या स्फोटामुळे मृत्यू झाल्याची ही पहिलीच घटना आहे. त्याच्या बेडरुममध्ये या सिगारेटचा स्फोट झाला.

टलमाडगे वेकमन डी एलियाने CNBC साठी प्रोड्युसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर तो फ्रि लान्स काम करत होता डेल क्लेइन या त्याच्या शेजारी राहणाऱ्या महिलेने या दुर्घटनेनंतर टलमाडगे वेकमन डी एलियाच्या मृतदेहाची ओळख पटवली. डेलि मेलने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

टलमाडगे वेकमन डी एलिया हा ३८ वर्षांचा होता. स्मोक इ माऊंटन कंपनीची सिगारेट त्याच्याकडे होती. या सिगारेटचा अचानक स्फोट झाला आणि त्यात तो भाजला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याचा मृत्यू झाला.