07 August 2020

News Flash

उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदासाठी वरुण योग्य – मेनका गांधी

आपले पुत्र व सुलतानपूरचे भाजप खासदार वरुण गांधी उत्तर प्रदेशात भाजपप्रणीत सरकारचे नेतृत्व करण्यास सक्षम आहेत व केंद्राप्रमाणे राज्यातही भाजपचे सरकार असेल,

| August 5, 2014 12:06 pm

आपले पुत्र व सुलतानपूरचे भाजप खासदार वरुण गांधी उत्तर प्रदेशात भाजपप्रणीत सरकारचे नेतृत्व करण्यास सक्षम आहेत व केंद्राप्रमाणे राज्यातही भाजपचे सरकार असेल, तर त्याचा उत्तर प्रदेशला फायदाच होईल, अशा शब्दात केंद्रीय मंत्री मेनका गांधी यांनी वरुण गांधी यांची उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदावरची दावेदारी जाहीर करून टाकली. महिला व बालविकासमंत्री असलेल्या वरुणच्या मातोश्री मेनका गांधी यांनी सांगितले, की राज्यात आमचे सरकार असणे केव्हाही चांगले कारण अधिकाराने आम्ही कामे करून आणू शकू. जर आपला मुलगा वरुण मुख्यमंत्री झाला तर त्याचा पिलीभीतला मोठा फायदा होईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 5, 2014 12:06 pm

Web Title: varun will be a better cm for uttar pradesh says maneka gandhi
Next Stories
1 ..तरच विधानसभेची उमेदवारी
2 प्रशिक्षणार्थी कायद्यात बदल करू
3 मी आधी भारतीय, मग राजस्थानी – सरन्यायाधीश
Just Now!
X