काँग्रेसमधून बाहेर पडून स्वतंत्र पक्ष स्थापन करण्यास दोन दिवसांचा अवधी राहिलेला असतानाच बुधवारी माजी केंद्रीय मंत्री जी. के. वासन यांनी आपल्या नव्या पक्षाच्या ध्वजाचे अनावरण केले. राष्ट्रीय ध्वजाशी साधम्र्य असलेल्या पक्षाच्या ध्वजात केशरी, पांढरा आणि हिरवा रंग असून त्यावर माजी मुख्यमंत्री के. कामराज आणि काँग्रेसचे माजी नेते जी. के. मूपनार यांच्या प्रतिमा आहेत. या प्रतिमा निळ्या रंगातील आहेत. तामिळनाडूतील काँग्रेस पक्षाबाबत निर्णय घेताना केंद्रीय निरीक्षकांनी उचललेली पावले अयोग्य होती, असे मत वासन यांनी व्यक्त केले आणि समर्थकांसह पक्षत्याग केला होता.