30 September 2020

News Flash

‘पद्म’साठी वसुंधराराजे यांनी ललित मोदींच्या नावाची शिफारस केली होती

आयपीएल गैरव्यवहारातील आरोपी ललित मोदी यांना मदत केल्यावरून आधीच अडचणीत सापडलेल्या राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे यांच्यापुढील अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.

| July 8, 2015 02:25 am

आयपीएल गैरव्यवहारातील आरोपी ललित मोदी यांना मदत केल्यावरून आधीच अडचणीत सापडलेल्या राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे यांच्यापुढील अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. वसुंधराराजे यांनी 2007 मध्ये देशातील प्रतिष्ठेच्या ‘पद्म’ पुरस्कारांसाठी ललित मोदी यांच्या नावाची शिफारस केली होती, अशी माहिती काही माध्यमांनी दिली आहे.
2007 मध्ये राजस्थानात वसुंधराराजे यांचे सरकार सत्तेवर होते. त्यावेळी त्यांनी ललित मोदी यांच्या नावाची शिफारस या पुरस्कारासाठी केली होती. राजस्थानमध्ये क्रिकेटच्या प्रसारासाठी ललित मोदी यांनी केलेल्या भरीव कामगिरीमुळे त्यांचे नाव त्यावेळी केंद्र सरकारकडे पाठविण्यात आले होते.
राजस्थान क्रिकेट संघटनेचे माजी सचिव सुभाष जोशी यासंदर्भात म्हणाले, ललित मोदी यांचे नाव पद्म पुरस्कारांसाठी पाठविण्याच्या वसुंधराराजे यांच्या निर्णयामध्ये काहीही गैर नाही. त्यावेळी ललित मोदी त्यांच्यावरील सर्व जबाबदाऱया यशस्वीपणे पार पाडत होते. त्यामुळे त्यांच्या नावाची शिफारस करण्यात काहीच गैर नाही. ते त्यावेळी राजस्थान क्रिकेट संघटनेचे अध्यक्षही होते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 8, 2015 2:25 am

Web Title: vasundhara raje recommended lalit modis name for a padma award
Next Stories
1 इस्लाम धर्मातील कट्टर विचारसरणीचा देशाला धोका- स्वयंसेवक संघ
2 दिल्लीच्या स्वतंत्र दर्जासाठी सार्वमत आजमावण्याची ‘आप’ची खेळी
3 ग्रीसच्या प्रस्तावांची युरोपला अपेक्षा
Just Now!
X