राजस्थानमध्ये कॉंग्रेसचे राज्य उलथून टाकत एकहाती सत्ता मिळवणाऱया भारतीय जनता पक्षाच्या नेत्या वसुंधरा राजे यांनी शुक्रवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. वसुंधरा राजे दुसऱयांदा राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होत आहेत.
राजस्थानच्या राज्यपाल मार्गारेट अल्वा यांनी ६० वर्षांच्या वसुंधरा राजे यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. राजस्थानमधील विधानसभेच्या आवारात हा शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथसिंह, भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, छत्तीसगढचे मुख्यमंत्री रमणसिंह यांच्यासह इतर नेते उपस्थित होते. शुक्रवारी झालेल्या शपथविधी सोहळ्यात फक्त वसुंधरा राजे यांनीच शपथ घेतली.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने राजस्थानमधील १९९ पैकी १६२ जागांवर विजय मिळवला आहे.