येत्या नोव्हेंबर महिन्यापासून गोव्यात परदेशी पर्यटकांना स्वस्त खरेदीचा आनंद लुटता येणार आहे. कारण त्यांनी खरेदी केलेल्या वस्तूंवरील व्हॅटचा परतावा त्यांना होणार आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी शुक्रवारी ही घोषणा केली.
गोवा मंत्रिमंडळाने मूल्याधारित करप्रणाली (व्हॅट) कायदा २००५ मध्ये सुधारणा केली आहे. राज्याच्या भेटीवर येणाऱ्या परदेशी पर्यटकांना व्हॅटचा परतावा करण्याची योजना आखण्याचे अधिकार सरकारला देण्यात आले आहेत.
परदेशी पर्यटकांना देण्यात आलेल्या सवलतीचा अभ्यास करून त्यानंतर या योजनेचा लाभ देशी पर्यटकांना देण्याचा विचार केला जाईल, असे पर्रिकर म्हणाले.