कुख्यात चंदनतस्कर वीरप्पन याच्या पत्नीला अन्नदान कार्यक्रम आयोजित करण्याची परवानगी मद्रास उच्च न्यायालयाने दिली आहे.

वीरप्पन याचा ज्या दिवशी मृत्यू झाला त्या दिवशी त्याची पत्नी अन्नदानाचा कार्यक्रम आयोजित करते. गेल्या ११ वर्षांपासून आपण हा कार्यक्रम आयोजित करीत आहोत, असे वीरप्पनची पत्नी मुथुलक्ष्मी हिने आपल्या याचिकेत म्हटले आहे.

आपण मेत्तूर पोलिसांकडे अन्नदान कार्यक्रमाची परवानगी मागितली होती, मात्र पोलिसांनी ती नाकारली. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाच्या प्रसिद्धीसाठी उभारण्यात येणाऱ्या बॅनरलाही पोलिसांनी परवानगी नाकारली, असे मुथुलक्ष्मी यांनी सांगितले.या याचिकेवर न्या. एम. एम. सुंदर्श यांनी पोलिसांना सदर परवानगी देण्याचे आदेश दिले आहेत.