केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू मागील १४ वर्षांत नऊ वेळा हवाई अपघातातून बचावले आहेत. विमानात झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे या घटना ओढावल्या होत्या. बुधवारी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि व्यंकयया नायडू यांना घेऊन जाणाऱ्या चार्टड विमानातही तांत्रिक बिघाड निर्माण झाला. त्यामुळे दोन्ही नेत्यांना इंफाळकडे घेऊन जाणाऱ्या या विमानाची फेरी रद्द करावी लागली. दोन्ही नेते एन. बीरेन सिंह यांच्या शपथविधीत सहभागी होण्यासाठी जात होते. उड्डाण करताच ४० मिनिटांतच हे विमान पुन्हा दिल्लीत परतले.
नायडू आणि विमान अपघाताचा प्रवास २००३ पासून सुरू झाला होता. त्यावेळी एअर डेक्कनच्या उद्घाटनावेळी विमानाच्या इंजिनमध्ये आग लागली होती. त्यानंतर अनेकवेळा त्यांनी घेऊन जात असलेले हेलिकॉप्टर कोसळता कोसळता बचावले आहेत. या घटना नागालँड, मेघालय, झारखंड आणि राजस्थानच्या सिरोही येथे झाल्या आहेत. बुधवारी जेव्हा त्यांचे विमान दिल्लीकडे परतल्यानंतर एकाने नायडू यांच्याबरोबर हवाई प्रवास करण्याची कोणात हिंमत नसल्याची टिप्पणी केली. परंतु शहा यांनी नायडू प्रत्येकवेळी सुरक्षित राहिले असल्याचे म्हटले.