केंद्र सरकारने १ मार्चपासून ६० वर्षांवरील वृद्धांसह ४५ ते ५९ वयोगटातील हृदयविकार, मेंदूरोगासह दहा वर्षे मधुमेह व इतरही आजाराच्या व्यक्तींसाठी लसीकरण सुरू केले आहे. या गटातील व्यक्तींकडून लसीकरणाला प्रतिसादही सर्वाधिक मिळत आहे. या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनी आज (शनिवार)करोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला. ही लस घेतल्यानंतर त्यांनी ट्विटद्वनारे प्रतिक्रिया व्यक्त केली.

“करोना प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डोस घेतला, त्याबाबत मी आभारी आहे. हे खूपच सहज आणि वेदनारहित. प्रत्येक व्यक्तीस लवकरच करोना लस मिळून तो सुरक्षित होईल, असं मला खरच वाटतं.”अशा शब्दांमध्ये रतन टाटा यांन भावना व्यक्त केल्या आहेत.

संपूर्ण देशात करोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला १ मार्च पासून सुरूवात झाली आहे. या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्वात प्रथम लस घेतली होती. त्यानंतर अनेक मंत्री, नेत्यांनी ही लस घेतली आहे.