मलेशियाच्या बेपत्ता एमएच ३७० विमानाचा तुकडा भारतीय समुद्रात आढळून आल्याने या विमानाविषयीचे कोडे उलगडण्यास मदत होणार आहे.
मलेशियन कंपनीचे हे विमान वर्षांपूर्वी २३९ प्रवाशांना घेऊन बेपत्ता झाले होते. बोईंग कंपनीचे ७७७ या श्रेणीतील हे विमान होते. या विमानाचा एक तुकडा भारतीय समुद्रात सापडल्याचा दावा मलेशियाचे उपवाहतूकमंत्री अब्दुल अझीझ काप्रावी यांनी केला आहे. ही माहिती त्यांना विमान शोधमोहिमेचे प्रमुख कोक सू चोन यांनी दिली आहे.
हेअवशेष भारतीय द्वीपसमूहांजवळ आढळले आहेत. मात्र ते या विमानाचेच असल्याची खातरजमा करण्यासाठी मलेशियाने तो तुकडा पॅरिसला पाठविणार असल्याचे अझीझ यांनी सांगितले.
मलेशियन विमान कंपनीचे एमएच ३७० विमान मागील वर्षी ८ मार्चला २३९ कर्मचारी आणि प्रवाशांना घेऊन क्वालालंपूरहून बीजिंगला जात होते. या वेळी हे विमान संपर्क तुटून बेपत्ता झाले होते. यानंतर वर्षभर या विमानाचा शोध सुरू होता. मात्र ते सापडू शकले नव्हते. या विमानातून चार भारतीयही प्रवास करत होते.